थोरगव्हाणच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय स्तरावर यश – "चॅम्पियन ऑफ चॅम्पियन" ट्रॉफीने गौरव
महाराष्ट्र अबॅकस असोसिएशनतर्फे आयोजित नॅशनल ऑनलाईन अबॅकस असोसिएशन कॉम्पिटिशन 2025 मध्ये थोरगव्हाण येथील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत "चॅम्पियन ऑफ चॅम्पियन" ही मानाची ट्रॉफी पटकावली आहे.
या स्पर्धेत थोरगव्हाणच्या विद्यार्थ्यांची बॅच राष्ट्रीय पातळीवर चमकली असून खालील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले:
1. दर्शन किरण पाटील
2. तन्वी हर्षल पाटील
3. दर्शना उमेश कोल्हे
4. तोषिता गणेश चौधरी
5. गुंजन कुणाल राणे
या विद्यार्थ्यांना सातपुते सर आणि उमेश महाजन सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या प्रयत्नातून आणि विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण सरावातून हे यश शक्य झाले.
"चॅम्पियन ऑफ चॅम्पियन" ट्रॉफी हा पुरस्कार केवळ या विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे नव्हे, तर थोरगव्हाण गावाच्या शैक्षणिक गुणवत्तेचेही प्रतीक आहे. त्यांच्या या यशामुळे गावात आणि शाळेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून शिक्षक, पालक, ग्रामस्थ यांच्याकडून विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
हे यश निश्चितच इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.