Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


थोरगव्हाण येथील देशमुख विदयालयात शिक्षक पालक संघाची स्थापना

पालक संघ स्थापनेसाठी प्रेरक पाऊल

डी. एस. देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, थोरगव्हाण येथे शासनाच्या निर्देशानुसार पालक-शिक्षक संघ (PTA) स्थापन करण्यासाठी शाळा व्यवस्थापनाने पुढाकार घेतला आहे. पालक संघ हा शाळा व पालक यांच्यातील एक सशक्त दुवा ठरतो. गुणवत्तापूर्ण शिक्षण, शिस्त व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात या संघाची मोलाची भूमिका असते.

या संघ स्थापनेचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे शाळेतील शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरण सुधारण्यासाठी पालकांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करणे. विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर लक्ष ठेवणे, शाळेच्या विद्यार्थी हिताच्या योजनांमध्ये पालकांचा सहभाग वाढवणे व शिक्षक-पालकांमध्ये सुसंवाद प्रस्थापित करणे हे या संघाचे मुख्य कार्य राहणार आहे.

संघ स्थापनेसाठी नुकतीच एक प्राथमिक बैठक घेण्यात आली. यामध्ये पालक प्रतिनिधींची निवड करण्यात आली. पदाधिकाऱ्यांमध्ये खालील निवडी करण्यात आल्या:

अध्यक्ष – मुख्याध्यापक डी. के. पाटील

उपाध्यक्ष –  चंद्रकांत मुरलीधर कोल्हे

सचिव –जयश्री प्रविण चौधरी ( उपशिक्षिका)

सहसचिव – अमोल गौतम चक्रे (पालक प्रतिनिधी)


इयत्तानिहाय पालक प्रतिनिधी पुढीलप्रमाणे निवडण्यात आले .

इ. ५ वी: अ - सौ. सुवर्णा अतुल तायडे, ब -  सुनील मधुकर बाऊस्कर

इ. ६ वी: अ -रमेश सुखदेव कुंभार, ब - गणेश यशवंत ठाकरे

इ. ७ वी: अ - छाया सुरेश रोटे, ब -  विजय भागवत शिंदे

इ. ८ वी: अ - मंगादास सखाराम कोळी, ब -प्रतिभा गुणवंत बाऊस्कर

इ. ९ वी: अ - सरला अशोक चौधरी, ब - सुरेश शिवराम ठाकरे

इ. १० वी: अ - श्री. प्रभाकर सुका कोळी, ब - श्री. विजय पुरुषोत्तम चौधरी

इ. ११ वी (कला शाखा) हरिचंद्र रामा नाले

इ. १२ वी (कला शाखा) दत्तात्रय भागवत पाटील


वरील सर्व प्रतिनिधींची निवड शैक्षणिक वर्ष २०२५–२६ साठी करण्यात आली आहे. पालक शिक्षक संघ पदाधिकारी जेष्ठ शिक्षक टी पी घुले यांनी नवनियुक्त मुख्याध्यापक यांचा याप्रसंगी स्वागत सन्मान केला .

या पालक-शिक्षक संघाच्या माध्यमातून लवकरच विविध उपक्रम जसे की आरोग्य तपासणी शिबिर, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व व्यक्तिमत्त्व विकासासाठी विविध कृती कार्यक्रम राबवले जाणार आहेत.

पालक संघाच्या स्थापनेमुळे शाळा व समाज यांच्यातील नाते अधिक दृढ होणार असून, विद्यार्थ्यांच्या हिताच्या दिशेने हे एक सकारात्मक व महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. असे मत महाशय मुख्याध्यापक डी के पाटील यांनी व्यक्त केले .

सभेचे प्रास्ताविक पालक निवडसाठी व सूत्रसंचालन संघाच्या सचिव जयश्री प्रविण चौधरी यांनी केले. इयत्ता ५ वी ते १२ वी पर्यंतच्या सर्व वर्गशिक्षकांसह अनेक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.