Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


संत सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित् वृक्षारोपण करण्याचा सुरेंद्रसिंग पाटील यांची संकल्पना पूर्ण करण्याचा माळी समाज बांधवांचा निर्धार

*संत सावता महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने सर्व  समाज बांधव वृक्ष लावणार डॉ.सुरेंद्रसिंग पाटील यांच्या संकल्पनेनुसार हॉल बुक करताना वधू-वर यांना जाळी व वृक्ष देणार. 
श्री.कैलासभाऊ महाजन*.                                     
आज थोर संत सावता माळी महाराज पुण्यतिथी या निमित्ताने माळी समाजातर्फे दिवसभर भरपूर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले होते. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. त्यात प्रामुख्याने संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या समकालीन असणारे संत सावता माळी हे मराठी संत कवी म्हणून ओळखले जातात. संत नामदेव महाराज अभंगात संत सावता महाराज यांच्या विषयी लिहितात धन्य ते उरण, रत्नांचीच खाण। जन्माला निधान सावता तो।। सावता सागर, प्रेमाचा आगर। घेतला अवतार माळ्या घरी।। यावरून आपणास संत सावता महाराजांचे कार्य किती महान होते हे लक्षात येते. संत सावता महाराजांनी इ.स.1295 ला समाधी घेतली. सर्व कार्यक्रम पूर्ण होत असताना पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे संचालक डॉ. सुरेंद्रसिंग पाटील हे संत सावता माळी महाराज यांना आदरांजली देण्याकरता माळी हॉल येथे येऊन सावता महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून सर्व माळी समाजाचे पदाधिकारी व समाज बांधवांना घरातील सर्व सदस्या सहित वृक्षारोपण करण्याची विनंती केली तसेच हॉलमध्ये जेही लग्नकार्य होतील त्यात वधू-दोघांना लग्नाची आठवण म्हणून सासरी आणि माहेरी दोघे ठिकाणी वृक्ष लावण्याकरता वृक्ष व जाळी हॉलमार्फत देण्यात यावी अशी विनंती माळी समाजाचे अध्यक्ष श्री. कैलास भाऊ महाजन सचिव गजेंद्र महाजन सुरेश महाजन धनंजय महाजन सुधाकर महाजन शैलेश माळी राजू माळी तसेच सोनवणे रामकृष्ण माळी या सर्वांच्या उपस्थितीत करण्यात आली. माळी समाजाचे अध्यक्ष श्री. कैलासभाऊ महाजन यांनी सदर उपक्रमाचे कौतुक करत आपण सांगितल्याप्रमाणे हॉलमध्ये होणाऱ्या लग्नांना वधू-वर यांना झाड लावण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येईल. तसेच आदरणीय प्रधानमंत्री यांच्या एक पेड मॉ के लिए अभियान दोन सहभागी होऊन समाजातील सर्व पदाधिकारी व सदस्य आपल्या कुटुंबासमवेत संगोपनासहित वृक्षारोपण करून  आपले शहर हिरवेगार होण्यास मदत करतील.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.