भुसावळ येथील नवोपक्रम घेण्यात अग्रगण्य असलेले बऱ्हाटे शैक्षणिक संकुलात या वर्षी आषाढी एकादशी निमित्त वृक्षदिंडी काढण्यात आली. सुरुवातीला संस्था अध्यक्ष श्री परिक्षीतभाऊ बऱ्हाटे यांनी विठ्ठल रुक्मिणी मुर्ती पुजन केले. पालखीची पुजा करून पुष्पहार अर्पण केला. रोपाची पुजा करुन झाड हा एक देवच आहे जे निस्वार्थीपणे आपल्याला फळे फुले सावली देतात हा विचार विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविण्यात आला. त्यानंतर काही विद्यार्थ्यांनी टाळ तर काही विद्यार्थ्यांनी रोप डोक्यावर घेउन टाळ मृदुंग घेउन दिंडी काढण्यात आली. त्यात झाडे जगवा झाडे वाचवा असे संदेश देणाऱ्या वाचन पट्ट्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या हातात घेतल्या होत्या. दिंडी सोहळ्यात विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा करुन संस्कृतीचे जतन केलेले दिसून येते.
रोपं वाजतगाजत आणून संस्था अध्यक्ष मा परिक्षीतभाउ बऱ्हाटे व संस्थेचे सचिव श्री एस डी बऱ्हाटे सर यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाला मुख्याध्यापिका सौ हेमांगिनी चौधरी मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षीका जयश्री चौधरी उपस्थित होत्या.
कार्यक्रमाला सुत्रसंचालन ममता फालक यांनी केले. कार्यक्रमप्रमुख राजेश इंगळे सर होते. सुनिता बऱ्हाटे,सुनिता पाटील,ज्योती चौधरी,कमलाकर झोपे,दिपाली सरोदे,वैभव नेमाडे यांनी कार्यक्रमासाठी परीश्रम घेतले.