थोरगव्हाण गावात विकासाची नवी पहाट, आमदार चंद्रकांत भाऊंच्या प्रयत्नांना ग्रामस्थांचा भरभरून प्रतिसाद .
मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघातील थोरगव्हाण हे सुमारे पाच हजार लोकसंख्येचे गाव, गेल्या अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित राहिले होते. अलीकडील काळात गावाच्या विकासाचे नवे पर्व सुरू झाले आहे, आणि त्याचे श्रेय जाते आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या दूरदृष्टीपूर्ण संकल्पनांना.
आमदार चंद्रकांतभाऊ पाटील यांचे पुढाकारातून थोरगव्हाण ते भुसावळ, थोरगव्हाण ते तासखेडा व गाते या दिशांना जाणारे रस्ते विकसित करण्यात आले. यामुळे शेतकरी वर्गासाठी दळणवळण आणि वाहतूक अधिक सुलभ झाली आहे. याशिवाय गावातील अनेक शिवरस्त्यांचे काँक्रिटीकरणही पूर्णत्वास गेले आहे.
गावातील पुरातन काळभैरव मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला असून, नवीन काळभैरव मंदिर सभागृह सुद्धा उभारण्यात येत आहे. लग्न समारंभ व धार्मिक कार्यक्रमांसाठी हे सभागृह उपयुक्त ठरणार आहे.
शिक्षण क्षेत्रातही मोठी पावले उचलण्यात आली आहेत – मराठी शाळेतील वर्गांचे डिजिटलायझेशन तसेच शाळेच्या संरक्षक भिंतीचे बांधकाम हे कामे पूर्ण झाली आहेत.
या सर्व विकासकामांमुळे गावामध्ये आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण आहे. ग्रामस्थांकडून आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्यावर अभिनंदनाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.