सोशल मिडीयावर महापुरुषांच्या व मंत्र्यांच्या अवमान करणाऱ्या माथेफिरूवर कठोर कारवाई करा - थोरगव्हाणकर लेवा पंचायत समितीची मागणी
भुसावळ
सोशल मिडीयाच्या माध्यमातुन लोकप्रतिनिधी व समाजाला अपमानस्पद बदनामी करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करावी अश्या मागणीचे निवेदन भुसावळ येथील थोरगव्हाणकर लेवा पंचायत समिती व बांधवातर्फे उपविभागीय पोलीस अधिकारी यांना देण्यात आले आहे . निवेदनात म्हटले आहे की डोंबिवली येथे राहणारा भुषण बी. पाटील यांनी ह्यांच्या फेसबुकावरून भुसावळचे आमदार व वस्त्रोद्योग मंत्री ना. संजयभाऊ सावकारे व त्याच्या पत्नी बद्दल अश्लील अशी शब्द प्रयोग केले असुन त्यानेच महामानव भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबत ही अपशब्द वापरले आहे. त्याच्या कृत्याचा आम्ही तीव्र निषेध करतो.
यापूर्वी याच समाज कंटकाने लेवा समाज व थोरगव्हाणकर लेवा समाज आणि सामाजीक कार्यकर्ते तसेच समाजातील प्रतिनिधी व्यक्तीला यांच्या बद्दलही अश्लील शब्दप्रयोग सोशल मिडीयाच्या माध्यमातुन केला आहे. सदर समाज कंटकावर कठोर कार्यवाही करावी . अशी मागणी करण्यात आली आहे .
निवेदनावर अध्यक्ष दिनेश पाटील , मनोज कुरकुरे , परशुराम चौधरी ,चंद्रशेखर चौधरी , चंद्रकांत पाटील , सुभाष चौधरी , दिनकर पाटील , हितेश पाटील , संजय चौधरी , अनिल पाटील , नरेंद्र पाटील , एम के पाटील , मनोहर लोणे , पी एस चौधरी , चारू दत्त पाटील, कैलास पाटील व समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत .