Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


पर्यावरण संतुलना साठी वाघ आणि नाग दोघांचे आस्तीत्व राहणे गरजेचे . पर्यावरण जागरचे डॉ सुरेंद्र सिंग पाटील यांचे आवाहन

 योगायोगाने नागपंचमी व जागतिक व्याघ्र दिन पर्यावरण संतुलनासाठी नागदेवता व वाघ  असणे गरजेचे.  असे आवाह पर्यावरण मित्र सुरेंद्रसिंग पाटील यांनी केले आहे .

   श्रावण शुक्ल पंचमी म्हणजे आषाढी अमावस्या नंतर श्रावण महिन्यातील पंचमी ही नागपंचमी नागदेवतासाठी साजरी केली जाते. नागदेवतेला देवाधिदेव महादेव यांचा सेवक  तसेच शेतकऱ्यांचा मित्र म्हणतात कश्यप ऋषीं आणी कटू यांच्यापासून सर्व प्रकारच्या नागांची निर्मिती झाली त्यांचे अधिपती भगवान शिव आहे समुद्रमंथनाच्या वेळी भगवान शिवांनी जेव्हा हलाहल विष पिलं तेव्हा त्यांना सहाय्य करण्यासाठी नऊ नाग आले त्या नागांनी ते विष ग्रहण केलं सृष्टीच्या रक्षणासाठी त्यांनी जे योगदान दिले त्यासाठी मनुष्य हा कायम कृतज्ञ राहील व आपली पूजा करेल असा आशीर्वाद दिला तेव्हापासून माणसाला हे नऊ नाग प्रिय झाले नागदेवता हे शेतकऱ्यांचे मित्र आहेत शेतामध्ये नुकसान करणारे उंदीर, बेडूक, घुस खाऊन त्यांचं प्रमाण कमी करत असतात शेतांमध्ये वारूळ मध्ये अधिवास असतो वारूळ पाण्याने भरले जातात त्यामुळे साप व नागाची पिल्ले जमिनीवर आलेले असता त्यामुळे त्यांचा अधिवास राहण्यासाठी नागरती करणे टाळावी लागते नागपंचमीच्या दिवशी नागांची व वारुळांची पूजा केल्याने सर्पापासून आपले संरक्षण होते. आपल्यात सर्पभय राहत नाही व विषबाधाही होत नाही. नागपंचमीला पूजा झाल्यानंतर महिला झाडांना झोके बांधून भावासाठी झोके खेळतात जसा झोका उंच जातो तसे भावाने उंच शिखर सर करावे जसा धोका खाली येतो त्याप्रमाणे त्याला येणाऱ्या अडचणी दुःखे खाली जाऊ द्या सद्यस्थितीत झोके खेळण्यासारखे झाडे राहिलेली नाहीत त्यामुळे आपल्या करता प्रार्थना करणारे ही प्रार्थना करू शकत नाहीत तरी आपण उंच शिखर गाठावे यासाठी प्रार्थना करणाऱ्या बहिणीसाठी वृक्षाचे वटवृक्ष रूपांतर होणारे झाडे लावावीत म्हणजे त्यावर झोका बांधून आपल्याला व आपल्या पुढील पिढीला उपयोगात येतील तसेच या दिवशी भाजी चिरणे, कापणे भाजणे या गोष्टी टाळल्या जातात. डॉ. सुरेंद्रसिंग पाटील पर्यावरण जागर प्रतिष्ठान                      29 जुलै जागतिक व्याघ्र दिन वाघ हा आपला राष्ट्रीय प्राणी आहे पर्यावरण दृष्ट्या निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वाघांचे संरक्षण संवर्धन करण्याची नितांत आवश्यकता आहे वाघ नसतील तर जंगलाचे सुद्धा अस्तित्व संपत जाईल निसर्गनिर्मित जे आहे ते काही ना काही कारणास्तव निर्माण केलेले आहेत त्यामुळे निसर्गावरील सर्व सजीवांचे असणे अत्यंत आवश्यक आहे. वाघ हे जंगलातील प्रमुख शिकारी आहेत शाकाहारी प्राण्यांची संख्या वाढत गेली तर त्यांना जंगलातील वनस्पती तसेच संपूर्ण हिरवळ व पाणी संपून  शेतामध्ये येऊन शेतकऱ्यांचा अतोनात नुकसान करतील. त्यासाठी जंगलातील प्राण्यांची संख्या नियंत्रणात राहणे आवश्यक आहे. ती संख्या नियंत्रणात ठेवण्याचे काम वाघ करत असतात. त्यामुळे पर्यावरणदृष्ट्या वाघाचे राहणे अत्यंत आवश्यक आहे वाघ नसले तर जंगलांच अस्तित्वही संपेल म्हणजेच निसर्गनिर्मित असलेली साखळी खंडित होऊन संपूर्ण व्यवस्था बिघडेल त्यामुळे असंतुलन बिघडून पर्यावरणावर प्रचंड प्रमाणावर फरक पडेल. वाघ जरी मांसाहारी असला तरी तो जंगलातच शिकार बघेल जंगल सोडून शेतामध्ये न येण्याचे दृष्टीने वनविभागाने व्यवस्था करणे गरजेचे आहे. मनुष्यप्राणी या दोघांना खूप घाबरत असला तरी      निसर्गाचा समतोल राहण्याच्या दृष्टीने नाग व वाघ हे दोन्ही जिवंत राहणे गरजेचे आहे हे खरे शेतकऱ्यांचे निसर्गनिर्मित मित्र आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.