Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


समता शिक्षक परिषदकडून विविध पदावर नियुक्त्या

समता शिक्षक परिषदेच्या विविध विभागाच्या जिल्हा कार्यकारिणी निवड प्रक्रिया उत्साहात संपन्न
माध्यमिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष श्री. भरत शिरसाठ यांनी नवनियुक्त कार्यकारिणी जाहीर केली

महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेचे राज्य अधिवेशन दिवाळी सुट्टीच्या कालावधीत जळगाव येथे होणार आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील विविध विभागांची ॲडहॉक कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. ही निवड माध्यमिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष श्री. भरत शिरसाठ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
जळगाव येथील माध्यमिक शिक्षक पतपेढी येथे दि. २७ जुलै रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निवड समितीचे प्रमुख श्री. धनराज मोतीराय प्रमुख उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष श्री. शिरसाठ यांनी संस्थांमधील संचालक मंडळातील वादांचा फटका थेट शिक्षकांवर बसत असून, त्यामुळे शिक्षकांचे मानसिक आरोग्य बिघडत आहे आणि त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे, असे सांगून या गंभीर बाबीकडे शासनाने विशेष लक्ष देण्याची गरज व्यक्त केली.
सन २०२५ ते २०३० या कालावधीकरिता निवड करण्यात आलेल्या कार्यकारिणीवर आगामी राज्य अधिवेशन यशस्वीपणे पार पाडण्याची मोठी जबाबदारी असणार आहे.

जळगाव पूर्व विभागाचे पदाधिकारी

जिल्हाध्यक्ष (प्रशासकीय विंग): श्री. योगेश गांधेले (भुसावळ)

जिल्हाध्यक्ष (उपक्रम विंग): मुख्याध्यापक श्री. एम. आर. चौधरी (वरणगाव)

जिल्हाध्यक्ष (महिला विंग): प्रा. मनीषा देशमुख (भुसावळ)

कार्याध्यक्ष: श्री. रवींद्र सोनवणे (किनगाव)

उपाध्यक्ष: श्री. सादिक तडवी (जामनेर), श्रीमती शुभांगी चौधरी (शेंदुर्णी)

सहसचिव: श्री. युवराज कुरकुरे (वरणगाव)


जळगाव पश्चिम विभागाचे पदाधिकारी

जिल्हाध्यक्ष (प्रशासकीय विंग): श्री. भैय्यासाहेब सोनवणे (आडगाव)

जिल्हाध्यक्ष (उपक्रम विंग): सौ. छाया सोनवणे / बैसाणे (चाळीसगाव)

जिल्हाध्यक्ष (महिला विंग): सौ. वर्षा अहिरराव (मेहरुण, जळगाव)

कार्याध्यक्ष: श्री. हेमेंद्र सपकाळे (धामणगाव)

उपाध्यक्ष: रावसाहेब वानखेडे (पारोळा), प्रकाश तामस्वरे (तळई), एस.आर. महाजन (जळगाव), नीता पाटील (चाळीसगाव)

सचिव: सोपान भवरे (अमळनेर), भारती ठाकरे (शिरसोली)

सहसचिव: शैला जाधव (अमळनेर)

जिल्हा संघटक: मुकेश बुंदे (बोदवड), श्रावण सोनवणे (धरणगाव)


इतर निवड

प्राथमिक विभाग जिल्हाध्यक्ष: अजय भामरे (अमळनेर)

प्राथमिक विभाग उपाध्यक्ष: जिवन शिरसाट (जळगाव)

प्राथमिक विभाग सचिव: प्रज्ञा तायडे (कुसुंबा, जळगाव)

टप्पा अनुदान समन्वयक: शंकर भामेरे (पहुर)

जळगाव शहर महानगर अध्यक्ष: टी. बी. पांढरे (जळगाव)


राज्य पातळीवरील निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार

नाशिक येथील राज्य कार्यकारिणी सभेत निवड झालेल्या खालील पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला:

श्री. रणजीत सोनवणे (शेंदुर्णी) – प्रदेश उपाध्यक्ष

श्री. प्रवीण केदार (एरंडोल) – प्रदेश सहसचिव

श्री. बी. टी. सपकाळे (रावेर) – प्रदेश सहकोषाध्यक्ष

श्री. बी. एन. पाटील (भडगाव) – प्रदेश कार्यकारिणी संघटक

श्री. गणेश बच्छाव (म्हसावद) – खानदेश विभाग अध्यक्ष

सौ. सरिता वासवानी (भुसावळ) – खानदेश विभाग महिला विंग अध्यक्षा

श्री. प्रमोद आठवले (भुसावळ) – उत्तर महाराष्ट्र विभाग कार्याध्यक्ष


यावेळी श्री. प्रमोद आठवले व धनराज मोतीराय यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. रणजीत सोनवणे यांनी तर आभारप्रदर्शन श्री. चिंतामण जाधव यांनी केले.
कार्यकारिणीच्या सर्व निवडीत उत्स्फूर्त सहभाग दिसून आला असून, सर्वांनी संघटनेच्या ध्येयधोरणांप्रमाणे निष्ठेने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.