Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


विवरा येथील बेंडाळे हायस्कूल मध्ये शिक्षक पालक संघाची सभा संपन्न

विवरा येथे बेंडाळे हायस्कूलमध्ये  पालक-शिक्षक सभा संपन्न:विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रमांची आखणी .

श्री. ग. गो. बेंडाळे हायस्कूल, विवरे येथे मुख्याध्यापक मा. पी. एच. वायकोळे यांच्या अध्यक्षतेखाली पालक-शिक्षक सर्वसाधारण सभा दिनांक . 25 जुलै 2025 रोजी दुपारी 3:00 वाजता उत्साही वातावरणात संपन्न झाली.

सभेच्या प्रारंभी सौ. निलीमा नेमाडे यांनी प्रास्ताविक करून मागील वर्षी राबविलेल्या उपक्रमांचा आढावा सादर केला व इतिवृत्त सभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आले. सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देत गुणवत्तावाढ, स्कॉलरशिप, NMMS, प्रज्ञाशोध परीक्षा, विज्ञान प्रदर्शन, ड्रॉइंग ग्रेड परीक्षा, शैक्षणिक सहली, विविध स्पर्धा व शालेय गणवेश आदी विषयांवर सखोल चर्चा झाली.

नवीन पालक-शिक्षक संघाची निवड यावेळी पार पडली. अध्यक्षपदी मुख्याध्यापक वायकोळे सर, उपाध्यक्ष दिनेश माळी, सचिव विशाल मछळे, सहसचिव सौ. अर्चना पाटील व वासुदेव सोनवणे यांची निवड झाली. तसेच प्रत्येक इयत्तेसाठी पालक सदस्य व शिक्षक प्रतिनिधी निश्चित करण्यात आले.

पर्यवेक्षक आर. टी. कोल्हे यांनी शाळेत होणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली तसेच सर्व शिक्षक-शिक्षिकांकडून घेतल्या जाणाऱ्या जादा तासिकांविषयी सांगितले.

दहावीचा निकाल 100% लागल्याबद्दल शाळेतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

पालक प्रतिनिधी सौ. अर्चना पाटील यांनी पोषण आहार शाळेतील स्वयंपाक करणाऱ्या महिलांनीच द्यावा व शिकवलेल्या घटकांवर लघुचाचण्या घ्याव्यात, अशी सूचना केली.

कलाशिक्षक ए. जे. सोळुंके यांनी विद्यार्थ्यांच्या शिस्तीबाबत शिक्षक व पालकांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे मत मांडले.

सभेचे उत्कृष्ट सूत्रसंचालन विशाल मछळे यांनी केले तर आभार प्रदर्शन एस. एन. तडवी यांनी केले.

या प्रसंगी महिला पालक, शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थांची उत्स्फूर्त उपस्थिती होती .
संस्थेचे अध्यक्ष प्रा . शैलेश राणे यांचे सह सर्व पदाधिकारी संचालक मंडळ यांनी या उपक्रमाचे अभिनंदन केले आहे .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.