मजूर महिला वर्गाची निगडित शेतकऱ्यांच्या शेतात निंदनी साठी जाणाऱ्या मजूर महिलांची *रोजंदारी* वाढवण्यासाठी जनरल मीटिंग भरवण्यात आली.
*सभेचा विषय* :- *बऱ्याच वर्षापासून या मजूर महिला १५० रुपये रोजाने एकंदरी शेतात निंदनी कामासाठी जातात परंतु महागाईच्या काळामध्ये* *तेल*, *साखर*, *औषधी*, *प्रवास खर्च*, *लाईट बिल* *आरोग्य* *शैक्षणिक फी*, *कपडे* खर्च महागाई *भाव* गगनाला भिडलेले दिसून येत आहे कधी माणसाला मजुरी मिळते कधी मिळत नाही महिलेच्या मजुरीवर घर खर्च कसा चालतो ते मजूर गरीब महिलेला माहिती आहे म्हणून उद्या दिनांक१६ जुलै२०२५ सकाळी ७ वाजता ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य व गावातील ज्येष्ठ वरिष्ठ मोठ्या शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत पिंपरी नांदू येथे अर्ध्या तासासाठी जमायचे आहे जेणेकरून गोरगरिबां ची महागाई संदर्भाची ओरड लक्षात घेतायेईल जाणीव होईल जनरल मीटिंग साठी सर्व गावातील गरजू होतकरू कष्टाळू उपसरपंच चित्रा तायडे विद्यमान सदस्य सुनंदाबाई भोई सदस्य किशोर पेटारे माजी सदस्य मधुकर भोई माजी सदस्य शोभाबाई अनिल कोळी वार्ड१,२,३ सर्व मजूर महिला या सभेला उपस्थित होत्या .