Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


कजगाव येथे लोंबकळलेल्या विद्युत केबल देत आहे अपघाताला आमंत्रण

लोंबकळलेल्या  विद्युत केबल देताय अपघाताला निमंत्रण
कजगाव ता.भडगाव ; येथे लोंबडणाऱ्या विजेच्या विद्युत पुरवठा करणाऱ्या केबल ग्रामस्थांसाठी धोकेदायक ठरत असून ह्या धोकेदायक केबलमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे
दोन दिवसांपूर्वी आलेल्या वादळी वाऱ्यात जीन भागातील व परिसरात विजेच्या पुरवठा करणाऱ्या केबल जमिनीपासून सात ते आठ फूट अंतरापर्यंत आल्या आहेत त्यामुळे अपघाताची भीती व्यक्त केली असून सदरील विद्युतं केबल जास्त खाली आल्याने नागरिकांनी रहदारीसाठी भीती व्यक्त केली आहे दोन दिवसापासून अनेक मागणी करूनही महावितरण कंपनी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप रहिवाश्यांनी केला आहे त्यामुळे ह्या विद्युत केबल तत्काळ वरती कराव्यात अशी मागणी त्या भागातील रहिवाश्यांनी केली

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.