Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


यावल व रावेर तालुक्याचे वरीष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण उत्साहात

रावेर-यावल तालुक्याचे वरिष्ठ व निवड वेतनश्रेणीचे प्रशिक्षण उत्साहात संपन्न.

थोरगव्हाण प्रतिनिधी .

वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी संदर्भातील माध्यमिक व प्राथमिक शिक्षकांचे प्रशिक्षण संपूर्ण राज्यामध्ये दिनांक 2 जून ते 12 जून पर्यंत घेण्यात आले यावल व रावेर तालुक्याचे प्रशिक्षण हे स्वामीनारायण गुरुकुल सावदा या ठिकाणी संपन्न झाले. सदर प्रशिक्षणामध्ये सर्व शिक्षकांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, राष्ट्रीय मूल्यांकन ,शैक्षणिक संशोधन या विषयावरच अनेक विषयांचे मार्गदर्शन करण्यात आले.त्याचबरोबर दहा दिवस ऑनलाईन पद्धतीने प्रत्येक तासाला प्रशिक्षणार्थ्यांची हजेरी घेण्यात आली. तसेच यावल रावेर तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचे वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणी असे दोन वर्ग प्रशिक्षणामध्ये होते तसेच माध्यमिक शिक्षकांचा वरिष्ठ वेतनश्रेणी हा एक वर्ग होता एकूण 153 प्रशिक्षणार्थी होते 12 सुलभकांनी उत्तम पद्धतीने प्रशिक्षणामध्ये त्यांना मार्गदर्शन केले .सकाळी 9:30 वाजेपासून ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत प्रशिक्षण पूर्णवेळ चालत असे यामध्ये सकाळी परिपाठांने सुरुवात व्हायची यामध्ये राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत, प्रतिज्ञा व मागच्या दिवशीचा आढावा वेगवेगळ्या गटाकडून घेतला जात असे तिन्ही कुलाचे प्रशिक्षणार्थी आपल्या कल्पकतेने रांगोळी, निसर्गातील साहित्य वापरून वर्गाची सजावट करीत असत, व आपल्या मधले असलेल्या अंतर्भूत गुणांना प्रदर्शित करीत  होते.
 या प्रशिक्षणाचे समन्वयक  गटशिक्षणाधिकारी रावेर साहेबरावजी शिंदे साहेब हे होते तर सह समन्वयक प्रफुल्ल जी मानकर,रावेर व संदीप मांडवकर,यावल हे होते प्रशिक्षणामध्ये विविध कृती युक्त अध्यापनाचा वापर  करून NEP-2020 च्या अनुषंगाने प्रशिक्षणार्थींना वेगवेगळ्या घटकाचे अध्यापन करण्यात आले . 5 जून जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्य साधून मान्यवरांच्या हस्ते याप्रसंगी पर्यावरण जनजागृतीसाठी श्री. राठोड सर यांच्या पुढाकाराने वृक्षारोपणाचा विशेष उपक्रम राबवण्यात आला. अशा रीतीने तीनही वर्गामध्ये सर्व घटक कार्य पूर्ण करून घेण्यासाठी सुलभकांनी आपले संपूर्ण कसंब वापरले व प्राशिक्षणार्थींनीही सुद्धा तितक्या  सक्रिय सहभागाने प्रशिक्षणाचे काम पूर्ण केले या प्रशिक्षणाचा समारोप दिनांक 12 जून 2025 रोजी संपन्न झाला. सुलभक  दीपक पाटील,नुरजहा खान, वसंत सोनवणे, शिवाजी पाटील, डॉ नरेंद्र महाले, सुनील देशमुख, विठोबा वाघ, रमेश राठोड, शालिनी मेश्राम, शितल पुरी यांनी कामकाज पाहिले व त्यांच्या कुलामध्ये त्यांच्या प्रशिक्षणार्थींना त्यांना विविध भेट वस्तू देऊन त्यांचा येतोच सन्मान व आपल्या भावना प्रगट केल्या दिनांक 12 तारखेला 153 प्रशिक्षणार्थींनी अंतिम उत्तर चाचणी दिली तीनही वर्गातील प्रशिक्षणाचे एकत्रितरीत्या शेवटच्या दिवशी सुरुची भोजनाची व्यवस्था केली व सर्व सुलभकांचे, प्रशिक्षणार्थी व संस्थेचे आभार  प्रशिक्षणाचे सह समन्वयक प्रफुल्ल मानकर सर यांनी संस्थेचे आभार व्यक्त करण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये स्वामी आनंद प्रसाद जी महाराज गोल्ड मेडलिस्ट बनारस हिंदू विश्व विद्यापीठ तसेच संस्थेचे सचिव श्री बी. डी. पाटील सर आणि श्री संजय वाघुळदे प्राचार्य यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. याप्रसंगी मान्यवर स्वामीजींचे विशेष उद्बोधन प्रशिक्षतार्थींना लाभले प्रसंगी संस्थेतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू जीवन सत्कार करण्यात आला होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  डॉ.महाले सर यांनी आपल्या खास शैलीने केले तर आभार प्रदर्शन संदीप मांडवकर सर यांनी मानले. शेवटी सर्वांना कार्यमुक्तीचे पत्र देऊन व स्वाध्याय कार्य देऊन प्रशिक्षणाचा समारोप करण्यात आला. असे महत्वपूर्ण प्रशिक्षणाचे अनुभवी समन्वयक प्रफुल्लजी मानकर यांनी कळवले आहे .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.