Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


थोरगव्हाण शाळेत सोमवारी विद्यार्थ्यांच्या आनंद प्रवेशाची घंटा वाजणार

थोरगव्हाण येथे शाळा प्रवेशोत्सवाची आनंदघंटा सोमवारपासून वाजणार!
डी. एस. देशमुख विद्यालयात नव्या वर्षाची उत्साही सुरुवात नियोजन .

दीर्घ उन्हाळी सुटी संपल्यानंतर, सर्वांच्या प्रतिक्षेची समाप्ती होत आहे. डी. एस. देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, थोरगव्हाण येथे शाळा प्रवेशोत्सवाचे औचित्य साधत, येत्या सोमवार, दिनांक १६ जून २०२५ रोजी शाळेची पहिली घंटा वाजणार आहे.

या खास दिवशी शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमात विद्यार्थ्यांचे स्वागत अत्यंत उत्साहात व आनंदमय वातावरणात होणार आहे. नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभासाठी शाळेत विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, या दिवशी शाळा आनंदोत्सवाचे रूप धारण करणार आहे.

 शासनाच्या सर्वशिक्षा अभियानांतर्गत इयत्ता ५ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना मोफत शालेय पाठ्यपुस्तकांचे वितरण शाळेतील मान्यवरांच्या शुभहस्ते होणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल उत्साह निर्माण करण्यासाठी हा उपक्रम मोलाचा ठरणार आहे.

 शाळेचे नवनियुक्त मुख्याध्यापक श्री. डी. के. पाटील यांनी विद्यार्थ्यांना नव्या जोमाने नव्या प्रवासाला सुरुवात करण्याचे आवाहन केले आहे.

 संस्थेचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत चौधरी, उपाध्यक्ष उमाकांत बाऊस्कर, सचिव पवन चौधरी, सहसचिव रामराव देशमुख आणि सर्व संचालक मंडळ, बंधु-भगिनींनी नव्या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

 शाळेची घंटा वेळेवर वाजणार असून, सर्व विद्यार्थ्यांनी  उपस्थित राहण्याचे आवाहन शाळेच्या वतीने करण्यात आले आहे. पाठयपुस्तके इयत्ता 5 वीत नव्याने प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत व गोड पदार्थ देवुन गोडवा वाढवणार आहेत .

 चला, नवा अध्याय सुरू करूया – ज्ञानाच्या मंदिरात पुन्हा एकदा नवा उत्सव!

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.