Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


थोरगव्हाण हायस्कूल मध्ये हिवताप जन जागृती कार्यक्रम संपन्न

प्राथमिक आरोग्य केंद्र तर्फे हिवताप प्रतिरोध जनजागृती कार्यक्रम .

थोरगव्हाण येथेहिवताप प्रतिरोध जन महिना जनजागृतीतून प्राथमिक आरोग्य केंद्र व दी एज्यूकेशन सोसायटी थोराव्हाण संचलित डी एस देशमुख हायस्कुल  येथे हिवताप बाबत घोषणा देण्यात आल्या व मलेरियाच्या आजारावर काय उपाययोजना करायच्या याबद्दल . जिल्हा हिवताप अधिकारी जळगाव डॉ प्रमोद सोनवणे यांचे मार्गदर्शनात थोरगव्हाण येथिल आरोग्य सेवक के के आदिवाले व के एम लुले सविस्तर माहिती देऊन विद्यार्थी मुला-मुलींमध्ये प्रात्यक्षिक करून घेतले व सर्व मुला-मुलींना स्वच्छतेचे संदेश व मलेरिया होणार नाही याबद्दल दक्षता घ्यावी अशी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले. गप्पी मासे पाळा व रोगराई टाळा संदेश दिला .
संस्था पदाधिकारी मुख्याध्यापक डी के पाटील ,वाय जे कुरकुरे , एस बी सपकाळे सर्वशिक्षक व प्राथामिक आरोग्य केंद्र थोरगव्हाण परिसरातील विद्यार्थी हजर होते .
आपल्या घरातील कुलरमधील पाणी दर चार दिवसांनी बदलून घ्यावे.
फ्रीजच्या मागील बाजूच्या भांड्यामधील पाणी दोन ते चार दिवसांनी काढून टाकले पाहिजे.
घरासमोरील गटार स्वच्छ ठेवण्यास सांगितले.
आजूबाजूच्या मोठ्या खड्ड्यांमध्ये काळे ऑईल टाकण्यास सांगितले.
झोपताना मच्छरदाणीचा वापर करणे.
आठ दिवसातून एक दिवस कोरडा पाळणे.
घरातील टाक्या झाकून ठेवणे.
याबद्दल सर्व माहिती देण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक डी के पाटील व सर्व शिक्षक तसेच आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.