थोरगव्हाण देशमुख हायस्कुल येथे मादक पदार्थ विरोधी दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम :सुदृढ समाजासाठी व्यसनमुक्ती हाच पर्याय – नंदकुमार चौधरी यांचे प्रतिपादन .
नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य व डी. एस. देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, थोरगव्हाण यांच्या संयुक्त विद्यमाने मादक पदार्थ सेवन विरोधी दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून युवकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दी एज्युकेशन सोसायटीचे संचालक नंदकुमार एकनाथराव चौधरी होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून मादक पदार्थांचे शरीर व मनावर होणारे दुष्परिणाम स्पष्ट करत, "व्यसनमुक्त समाजनिर्मिती ही काळाची गरज आहे," असे ठाम प्रतिपादन केले.
कार्यक्रमात संस्थेचे संचालक रविंद्र काशिनाथ ( काकाश्री ) चौधरी यांनी विद्यार्थ्यांना सुदृढ आरोग्याचे महत्त्व सांगताना त्यांनी अंगीकारलेल्या जीवनशैलीचे व दररोज पायी चालण्याचे फायदे विशद केले.
संचालक चंद्रकांत पाटील यांनी सामाजिक न्याय दिना निमित्त उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मनोगत मुख्याध्यापक डी. के. पाटील यांनी केले.
वाय. जे. कुरकुरे, एस. बी. सपकाळे यांच्यासह सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मादक पदार्थ सेवन विरोधी प्रतिज्ञा वाय जे कुरकुरे यांनी विद्यार्थ्यांकडून वदवुन घेतली . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार एस बी सपकाळे यांनी केले
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संपूर्ण विद्यालय परिवाराचे सहकार्य लाभले.