Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


निर्मल इंटनॅशनल स्कूल मध्ये योगा शिबीर संपन्न

*निर्मल इंटरनॅशनल स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा – विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग*
सतीश पाटील भडगाव तालुका
पाचोरा:-
निर्मल इंटरनॅशनल स्कूल, पाचोरा येथे ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यात आला. सकाळच्या सत्रात शालेय प्रांगणात हा विशेष योग दिवस पार पडला. या कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या अध्यक्षा आदरणीय वैशालीताई सुर्यवंशी यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली.या विशेष प्रसंगी प्रख्यात योगाचार्य नारायण मांडवडे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी विद्यार्थ्यांना विविध योगासने आणि प्राणायाम प्रकारांचे प्रात्यक्षिकांसह सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच योगामुळे होणारे शारीरिक व मानसिक लाभ, मनःशांती, ताणतणावमुक्त जीवनशैली यासंदर्भात विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण केली. आयुर्वेदाचे महत्त्व, त्यातील आहार-विहाराचे नियम यांचीही माहिती देऊन विद्यार्थ्यांना नैसर्गिक आरोग्याकडे वळण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
या प्रसंगी शाळेचे सचिव श्री. नरेंद्रसिंग सुर्यवंशी, प्राचार्य श्री. गणेश राजपूत, जनसंपर्क अधिकारी श्री. आय बी सिंग, समन्वयक सौ. स्नेहल पाटील, प्रशासकीय अधिकारी श्री. संतोष पाटील, तसेच शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या योग दिनाचे यशस्वी आयोजन व अंमलबजावणीसाठी शाळेतील क्रीडा शिक्षकांचे विशेष योगदान लाभले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.