सतीश पाटील भडगाव तालुका प्रतिनिधी
लासगाव तालुका पाचोरा येथे देशमुख नगर येथे राहणारे बाबू आजम शेख यांची मुलगी यांची मुलगी मुमताज ही आज सकाळी दहा वाजता कपडे धुऊन मागच्या साईटला कपडे वाळवण्यासाठी कपडे टाकत असताना काड्या जातीचा नाग. कोब्रा याने मुलीला दंश केल्यावर त्या मुलीला नांद्रा येथे प्रार्थमिक आरोग्य केंद्र येथे घेऊन गेल्यावर डॉक्टरांनी सर्पदंशाची लस टोचल्यावर तिला जळगाव येथे ॲम्बुलन्सने रवाना केले गेले असता जात असताना तिची जीवन ज्योत मावळली. सर्प जास्त विषारी असल्यामुळे किंचित लोक वाचतात असे सर्पमित्राने सांगितले. तिच्या अचानक जाण्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.