भुसावळ प्रतिनिधी:
शेतकरी व पर्यावरणाचा खरा साथीदार असलेल्या खैर वृक्षाचा प्रसार अधिक व्हावा असं आवाहन पर्यावरण तज्ज्ञ प्रा. के. पी. चौधरी यांनी केले आहे. शुष्क भागांमध्ये चांगला वाढणारा खैर शेतजमिनीचे संरक्षण, पर्यावरणाचा समतोल राखणे आणि शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नाचा स्त्रोत मिळवून देण्यात मदत करत आहे.
खैरचे लाकूड इमारत बांधणी व साधने तयार करण्याकरिता उपयोगी असते, तर त्याचा कत्था औषधी असलेल्या पान-मसाला व औषधांमध्ये वापरला जातो. शासकीय वन कार्यक्रमांद्वारा शेतकरी खैराची लागवड अधिक प्रमाणावर करत असलेल्या भागांमध्ये अनुदान व मार्गदर्शन दिले जाते.
पर्यावरण तज्ज्ञ प्रा. के. पी. चौधरी यांनी ओझरखेडा पाणी साठवण धरणाच्या मार्गावर असलेल्या खैर वृक्षांचे महत्व अधोराेखित केले असून इतर ही मोकळ्या माळरान भागांमध्ये छोट्या व मध्यम उंचीचे खैर आढळतात असं त्यांनी म्हटलं आहे.
खैर एक शाश्वत साधन असून शेतकरी व पर्यावरण दोघांनाही फायदा करणारा असल्याने अधिक शेतकरी यांनी खैर लागवडीकडे वळावे असं आवाहन केले आहे. शेतकरी बांधवाने शेताच्या बांधावर खैर वृक्ष वाढवला बाबत अभिनंदन करण्यात आले .