औष्णिक वीज तापघर अनियंत्रित पाणीवापर व प्रदूषणाचा शेतकऱ्यांवर गंभीर परिणाम – पर्यावरण तज्ज्ञ प्रा. के. पी. चौधरी यांचे आवाहन
दीपनगर औष्णिक वीज ताप घर २१० मेगावॅट, ५००x२ मेगावॅट व पिंप्रीसेकम मधील ६६० मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पांमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर जल, वायू व मृदा प्रदूषण होत असल्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत. या प्रकल्पांमुळे होणाऱ्या अनियंत्रित पाणीवापर, हलक्या निकृष्ठ प्रतीचा जळणारा कोळसा, तसेच पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून नेली जाणारी राख (ॲश) – यामुळे स्थानिक पर्यावरण व शेती क्षेत्रावर प्रतिकूल परिणाम होत आहे.
विशेषतः राख वाहून नेणाऱ्या ॲश पाईपलाईनमध्ये ॲश बंड पर्यंत होणाऱ्या गळतीमुळे पाईपलाईनच्या दोन्ही बाजूंच्या शेतजमिनी नापीक होत आहेत. सततच्या गळतीमुळे जमीन दूषित होत असून, जमिनीची सुपीकता कमी होत चालली आहे.
त्याचबरोबर, या केंद्रातून निघणाऱ्या बॉटम ॲश मुळे परिसरातील सर्व्हिस रस्त्यावर ये-जा करणारे शेतकरी, शेतमजूर, वाहनचालक यांना श्वसन व डोळ्याचे विकार होण्याचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. या सर्व बाबी अत्यंत गंभीर असून, याकडे संबंधित यंत्रणांनी तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.
या पार्श्वभूमीवर पर्यावरण अभ्यासक प्रा. के. पी. चौधरी यांनी EIA (Environment Impact Assessment) अहवाला मधील उल्लेख वाचून स्थानिक नागरिकांना आवाहन केले आहे की, “ज्या गावांमध्ये औष्णिक प्रकल्पा मुळे प्रदूषणाचा थेट परिणाम झाला आहे, त्या प्रभावित शेतकऱ्यांनी समितीसमोर निःसंकोचपणे आपली तक्रार व वास्तव मांडावे. प्रशासनाकडून समिती स्थापन झालेली असून, आपण आपली बाजू ठामपणे मांडली तरच योग्य उपाययोजना होऊ शकतात.”
प्रशासनाकडून ७ सदस्यीय तपासणी समिती गठीत करण्यात आलेली असून, ती बुधवार (दि. ४ जून) रोजी प्रत्यक्ष भेटीवर येणार आहे. त्यामुळे सर्व ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी सजग राहून आपले प्रश्न लेखी अथवा तोंडी स्वरूपात समितीसमोर मांडावेत, असेही आवाहन प्रगतीशील शेतकरी पर्यावरण आभ्यास राजेंद्र साहेबराव चौधरी यांचे तर्फे करण्यात आले आहे.
वेल्हाळे येथिल शेतकरी व शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे प योगेश (नागो ) पाटील यांनी सांगितले की सर्व परीसर राखमय झाला आहे त्यावर रोजगार करणाऱ्यावर अमानुष पद्धतीने गुन्हे दाखल करण्याचे षड्यंत्र महाजनको करीत आहे
प्रदूषण करणारे जबाबदार प्रकल्याचे पदाधिकारी यांचेवर गुन्हे दाखल करावे यासाठी आम्ही सर्व बाधित शेतकरी शेतमजुर समिती समोर वास्तव ठेवणार आहोत .