Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


स्व . किशोर यशवंत चौधरी यांचे दुखद निधन

निधन वार्ता

स्व किशोर यशवंत चौधरी

स्व. किशोर यशवंत चौधरी वय ६३ वर्षे 
वडीलांचे नाव यशवंत सिताराम चौधरी पुणे (शिक्षक) मुळगाव अट्रावल . येथील  रहिवासी व सध्या वडगावशेरी/खराडी, पुणे येथे वास्तव्यास असलेले स्व. किशोर यशवंत चौधरी (वय ६३) यांचे  दि. २८ मे २०२५ रोजी सकाळी ६ वाजता रुबी हॉस्पिटल, पुणे येथे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
   512 आर्मीबेस व वर्कशाॕप टेक्नीशियन म्हणून पुणे येथे प्रदिर्घ 38 वर्षे सर्हिस केली होती .  
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा श्री. प्रतीक किशोर चौधरी , सून काजल. मुलगी सौ. प्राची स्वप्नील राणे, जावई श्री. स्वप्नील साहेबराव राणे (नाशिक/पुणे), 
  बंधू- श्री. शशिकांत यशवंत चौधरी , श्री. महेंद्र यशवंत चौधरी, पुतण्या श्री. अमित शशिकांत चौधरी , तसेच श्री. यशवंत ( यदुभाऊ ) नथ्थू महाजन, सांगवी-पुणे यांचे व्याही होत. 
श्री. किशोर चौधरी हे अत्यंत शांत, मदतीस तत्पर आणि सामाजिक कार्यासाठी स्वतःला वाहून घेणारे व्यक्तिमत्त्व होते. लेवा पाटील सोसायटी, वडगावशेरी येथील ज्येष्ठ मार्गदर्शक तसेच लेवा पाटील थोरले मंडळ (LPTS), पुणे येथील दीर्घकाळ पदाधिकारी म्हणून त्यांनी निस्वार्थी सेवा केली. त्यांच्या निधनाने समाजाने एक प्रामाणिक व कर्तृत्ववान समाजसेवक गमावला आहे.

ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. परिवाराला या दुःखद प्रसंगी धैर्य मिळो, हीच प्रार्थना. सामाजिक गृपवर समाजबांधव यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पन केली आहे .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.