वरणगांव प्रतिनिधी
श्रीनाथ एज्युकेशन सोसायटी, वरणगाव संचालित गंगाधर सांडू चौधरी माध्यमिक विद्यालय, वरणगाव येथील इ. १० वी च्या विद्यार्थ्यांनी फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एस.एस.सी. परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. यंदा शाळेचा निकाल ८६ १५% लागला असून एकूण १३० पैकी ११२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
या परीक्षेत कु. लावण्या नरेंद्र सुरवाड ही विद्यार्थिनी ९२. ४०% गुणांसह शाळेत प्रथम आली आहे. कु. चौधरी भव्या महेश हिने ९२.२०% गुण मिळवत द्वितीय क्रमांक पटकावला असून कु. खंगार आवृत्ती प्रकाशचंद हिने ९१.४०% गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला.
या घवघवीत यशाबद्दल संस्थाअध्यक्ष संदीप चौधरी , सचिव किशोर झोपे, उपाध्यक्ष धिरेंद्र देशमुख, सर्व सन्माननीय संचालक मंडळ, मुख्याध्यापक मधुकर चौधरी व पर्यवेक्षक अविनाश देशमुख सर्व शिक्षकवृंद शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन केले.
इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन आहे याबाबत माहिती दिली व मार्गदर्शन मुख्याध्यापक एम आर चौधरी यांनी केले .