अजित पर्व युवा जोडो अभियान अंतर्गत भुसावळ येथे रावेर लोकसभा / जिल्हा जळगाव चा युवा संवाद मेळावा आयोजित करण्यात आलेला होता, मेळाव्याचे प्रमुख आकर्षण युवकांचे नेते, प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस, सुरज दादा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मेळावा करण्यात आले होते मेळाव्याला दादानी मनोगत मध्ये युवकांना संबोधित केले, त्याचबरोबर सुरज दादांच्या हस्ते काही युवकांचा प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये करण्यात आले, रावेर लोकसभा / जळगाव जिल्ह्याचा युवा संवाद मेळावा भुसावळ येथे अत्यंत उत्साहात पार पडला.
*अजित पर्व युवा जोडो अभियान, युवा संवाद मिळाव्याचे आयोजन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अरविंद चितोडीया यांच्यातर्फे करण्यात आले होते*
याप्रसंगी गुलाबरावजी देवकर माजी मंत्री तथा माजी पालकमंत्री जळगाव जिल्हा, उमेश नेमाडे जिल्हाध्यक्ष रावेर लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, संजयभाऊसाहेब पवार जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रावेर लोकसभा तथा अध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती बँक जळगाव जिल्हा, रवींद्र नाना पाटील प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, विनोद देशमुख,योगेश देसले जिल्हा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव लोकसभा, संतोष चौधरी शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भुसावळ, सुनील पाटील, सारांश भावसार प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस, अमर पाटील, रणजित नरुटे कुशल देशमुख सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस, रवींद्र भालेराव माजी नगरसेवक भुसावळ, शेख पापा शे. कालू माजी उपनगराध्यक्ष भुसावळ, वसीम शेख शहराध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस भुसावळ अश्विन सुरवाडे जिल्हा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस रावेर लोकसभा यांच्यासह पक्ष संघटनेतील इतर पदाधिकारी, कार्यकर्ते, शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.