Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


जीवन सुंदर आहे या विषयावर जय गणेश ज्येष्ठ नागरिक संघातर्फे मार्गदर्शन

श्री जय गणेश जेष्ठ नागरिक संघात *हे जीवन सुंदर आहे* यावर मार्गदर्शन
      भुसावळ  येथील श्री जय गणेश जेष्ठ नागरिक संघाची साप्ताहिक सभा नुकतीच पार पडली .या सभेत माजी केंद्रप्रमुख श्री सुपडू शंकर कुरकुरे यांचे "हे जीवन सुंदर आहे" या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. अध्यक्ष स्थान संघ अध्यक्ष डॉ.सुधा खराटे यांनी भूषविले .
          श्री गणेश पूजन व कै. अरुण मांडळकर सरांच्या प्रतिमेला माल्यार्पण  करून सभेची सुरुवात करण्यात आली. पाहुण्यांचा परिचय श्री नारायण वडदकर यांनी केला. श्री सुपडू कुरुकुरे यांनी प्रतिपादन केले की मनुष्याचे वेगळेपण म्हणजे त्याची बुद्धिमत्ता. या बुद्धीच्या सामर्थ्यावरच तो जीवनातील परिस्थितीशी संघर्ष करतो. प्रयत्न करीत दुःखाला सामोरे जातो . जीवनात आनंद व सुखाची प्राप्ती करीत असतो. संत गाडगेबाबा, मदर तेरेसा, बाबा आमटे व सिंधुताई सपकाळ यांनी दीनदुबळ्यांची सेवा करून इतरांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला व आपले जीवन सुंदर केले. जीवनात काही साध्य करायचे असेल तर सर्वप्रथम शरीर स्वास्थ्याकडे लक्ष द्या. आपल्याला मिळालेल्या मदतीपेक्षा इतरांना केलेल्या मदतीचा आलेख जेव्हा उंचावतो तेव्हा जीवनात आपोआप शाश्वत सुख मिळते व जीवन सुंदर बनते. अध्यक्षीय मनोगतात डॉ. सुधा खराटे यांनी विचार व्यक्त केले की परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टिकोन नेहमी सकारात्मक ठेवा. योग्य विचार व योग्य कृती झाली की जीवनात आनंद निर्माण होऊन जीवन सुंदर होते. स्वतः स्वयंप्रकाशित झालो तर इतरांच्या जीवनात प्रकाश देण्याची क्षमता येते.
     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव दिलीप तिडके यांनी केले तर आभार अशोक पाटील यांनी मानले. छायाचित्रण प्रकाश तायडे यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी  कार्यकारणी सदस्य व संघातील सभासदांनी सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.