Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


पाचोरा येथील आर ओ पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल शंभर टक्के

*आर. ओ. पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचा शंभर टक्के निकाल*
सतीश पाटील भडगाव तालुका प्रतिनिधी
पाचोरा:  आर. ओ. पाटील विज्ञान, वाणिज्य व कला कनिष्ठ महाविद्यालय, पाचोरा या नामवंत शिक्षणसंस्थेने यावर्षी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळामार्फत घेण्यात आलेल्या १२ वीच्या परीक्षेत शंभर टक्के निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखत यशाचा नवा अध्याय लिहिला आहे.
या यशस्वी निकालात देव प्रणव प्रदीप याने 86.67% गुणांसह महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. राठोड श्रुती प्रकाश हिने 83% गुणांसह द्वितीय स्थान मिळवले तर आदित्य अनंत पाटील याने 74.17% गुणांसह तृतीय क्रमांक मिळवून आपल्या कष्टाचे चीज केले. या गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या कर्तृत्वाने विद्यालयाचे नाव उज्ज्वल करत, समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे.
या निवडीबद्दल वैशालीताई सुर्यवंशी, सचिव श्री. नरेंद्रसिंग सुर्यवंशी, प्राचार्या सौ. स्नेहल पाटील तसेच संपूर्ण शिक्षकवर्ग यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे  मनःपूर्वक अभिनंदन केले आहे या घवघवीत यशासाठी विद्यार्थ्यांचे कष्ट, पालकांचे सहकार्य आणि शिक्षकांचे निस्वार्थ मार्गदर्शन निश्चितच प्रेरणादायी आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.