Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


थोरगव्हाण डी एस देशमुख हायस्कूल चा निकाल ६८ टक्के .सुरेखा कोळी प्रथम

सुरेखा कोळी प्रथम – डी. एस. देशमुख विद्यालयाचा निकाल ६८.४२%

थोरगव्हाण (ता. रावेर) – येथील डी. एस. देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा एचएससी निकाल ६८.४२ टक्के लागला आहे. या परीक्षेत ( तासखेडा ) येथील कु. सुरेखा नितीन कोळी हिने ७२.५० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. कु. कोमल भोलाणे ( मांगी ) हिने ६५.८३ टक्के गुणांसह द्वितीय, तर कु. दिपाली अशोक कोळी (तासखेडा) हिने ६४.१७ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला.

या यशाबद्दल दी एज्युकेशन सोसायटी, थोरगव्हाणचे अध्यक्ष चंद्रकांत चौधरी, उपाध्यक्ष उमाकांत बाऊस्कर, सचिव पवन चौधरी, सहसचिव रामराव देशमुख, सर्व संचालक मंडळ, विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. एस. वैष्णव, पर्यवेक्षक डी. के. पाटील, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व पालक वर्गाने विद्यार्थिनींचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत चौधरी म्हणाले, “मुलींच्या उच्च माध्यमिक शिक्षणासाठी संस्था सातत्याने कार्यरत आहे आणि यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. विद्यार्थीनींनी पुढील उच्चशिक्षण सुरू ठेवावे” सचिव पवन चौधरी यांनी सांगितले, “विद्यालयातून पहिला, दुसरा व तिसरा क्रमांक विद्यार्थिनींनी मिळविल्याने हे स्पष्ट होते की मुली कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत.”


---

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.