Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


भुसावळ फॅक्टरीत कामगार दिन साजरा

*१ मे जागतिक कामगार दिन / महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा!*
     
 ऑ. फॅक्टरी भुसावळ येथे लाल झेंडा प्रेरित कामगार युनियन तर्फे १ मे जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र दिन परंपरागत पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा केला गेला.
     परंपरानुसार सर्व कामगार लाल शर्ट व लाल झेंडे हातात घेऊन युनियन कार्यालयावर हजर झाले तेथून सायकल शेड ते ऑ. फॅक्टरी इस्टेट मध्ये कामगारांची भव्य प्रभात फेरी सकाळी ८.०० वाजता संपन्न झाली.  प्रभात फेरीत देशभक्तीपर गाण्यांसोबत महाराष्ट्र गीत, मेहनतकश कामगार गाण्याचा समावेश होता. या प्रसंगी *"१ मे दिवस अमर रहे" "मई दिवस के शहीद अमर रहे"* अशा घोषणांनी आयुध निर्माणी परिसर दुमदुमला. मुख्य रॅली संपन्न झाल्यानंतर प्रभात फेरीचे रूपांतर कामगार भवन येथे मुख्य सभेत झाले.

 त्या ठिकाणी मुख्य कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला, सर्वप्रथम लाल झेंड्याचे ध्वजारोहण युनियनच्या अध्यक्ष व पदाधिकारी यांच्या माध्यमातून झाले. कामगार आंदोलनात, संयुक्त महाराष्ट्र लढ्यात शहीदांना श्रध्दांजली समेत नुकताच पहेलगमाम हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री अरुण पाटील कार्यवेक्षक श्री प्रवीण पाटील,कार्यवेक्षक ऑ फॅ भुसावळ, विशेष उपस्थित श्री कैलास देवचंद ढाके श्री संदीप देवचंद ढाके, खेळात विषेश प्रावीण्य मिळविले कामगार श्री. दिपक गुप्ता, श्रीमती रेखाताई आव्हाड, एससी एसटी ओबीसी असो. चे साथी राजकिरण निकम, नितेश तायडे यांचा सत्कार याप्रसंगी करण्यात आला. 
     *याप्रसंगी "स्व. कॉ. देवचंद ढाके सार्वजानिक वाचनालय" युनियनचे माजी अध्यक्ष यांच्या नावाने सर्व कामगारांसाठी युनियनच्या वतीने सुरू करण्यात आले, त्याचे विधिवत उद्धाटन स्व. कॉ. देवचंद ढाके यांचे चिरंजीव श्री कैलास देवचंद ढाके श्री संदीप देवचंद ढाके, युनियनचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष,  पदाधिकारी व सर्व सभासदांच्या उपस्थितीत कामगार दिवसाच्या निमित्ताने करण्यात आले.*
    १ मे दिवस निमित्त विचार व्यक्त केले गेले त्यात प्रामुख्याने युनियनचे महासचिव कॉ. दिनेश राजगिरे यांनी मे दिवस महाराष्ट्र दिवसाचा इतिहास सांगितला व येणाऱ्या काळात कामगारांच्या न्याय, हक्क, सुरक्षिततेसाठी संघर्ष करण्याचा संकल्प दिला. श्री राजकीरण निकम यांनी एकजूट होऊन लढा देण्यात येईल सांगितले. याप्रसंगी विशेष उपस्थित स्व. ढाकेदादा यांचे चिरंजीव श्री कैलास देवचंद ढाके  यांनी आपले मनोगत व्यक्त केले, अत्यंत भावना विष स्थितीत त्यांनी आपल्या वडिलांचे कार्याचा विसर संघटनेला पडलेला नसल्याचे सांगितले, आज जवळपास ४० वर्षानंतर ही स्व. कॉ. देवचंद ढाके दादा नावाने सार्वजनिक खुल वाचनालयात उद्घाटन केलं गेलं व या कार्यक्रमाचा एक भाग आमचा परिवार झाल्याने त्यांनी युनियन बाबत व प्रत्येक सभासदाबाबत कृतज्ञता व्यक्त केली.
     कार्यक्रमाचे धन्यवाद प्रस्ताव युनियनचे अध्यक्ष साथी आशिष मोरे यांनी  व कार्यक्रमाचे उकृष्ट सूत्रसंचालन कॉ. गजानन इंगळे यांनी केले.
     या कार्यक्रमास युनियनचे सर्वस्वी कॉ. निलेश देशमुख, मीलेश देवराळे, किशोर बढे, नितीन देशमुख, विनोद धाडे, नितीन पाटील, योगेश आंबोडकर, हितेंद्र पाटील, संतोष बावीस्कर, गिरीश येवले, मिलिंद ठोंबरे, ज्ञानदेव सरोदे, धनंजय पिंपळे, विवेक नेहेते, पंकज सोनार, प्रमोद तायडे, राजु मंदवाडे, अनिल गरुड, हरिष बविस्कर, रवी पंडीत, गणेश मुस्कुले, हरीचरण बेलकर, रितेश तायडे, तुषार नाईक, जितू मोरे, आकाश सपकाळे, पंकज विसपुते, महेश देशमुख यांच्यासह सर्व पदाधिकारी सभासदांनी मेहनत घेतली व कार्यक्रम यशस्वीतेने पार पाडला. 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.