Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


सावदा येथील पोलीस सुनिल कुरकुरे यांचा पोलीस अधिक्षकांकडून सन्मान

मा .डॉ . महेश्वर रेड्डी यांनी सावदा पोलीस स्टेशनचे श्री. सुनील जानकीराम कुरकुरे यांचा केला सन्मान .

सावदा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस  सुनील जानकीराम कुरकुरे यांनी विशाल पाटील साहेब सपोनि व प्रभारी अधिकारी सावदा पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनात एक गोपनिय गुन्हा यशस्वीरित्या उघडकीस आणून उल्लेखनीय कामगिरी बजावली. कुरकुरे यांच्या  कार्याची दखल घेत सन्मान समारंभ. सन्माननीय डॉ .महेश्वर रेड्डी साहेब (IPS), पोलीस अधीक्षक जळगाव, यांच्या शुभ हस्ते  सुनिल जानकीराम कुरकुरे  यांना सन्मानचिन्ह व गौरवपत्र प्रदान करण्यात आले.

या सन्मानाने सावदा पोलीस स्टेशनसह संपूर्ण विभागात आनंदाचे व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या या कामगिरीने इतर कर्मचाऱ्यांसाठीही प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे."मा. सहाय्यक पोलीस निरीक्षक सन्माननीय विशाल पाटील साहेब तसेच दुय्यम अधिकारी पोलीस उप निरीक्षक श्री गर्जे साहेब, पोलीस उप निरीक्षक बशीर तडवी साहेब तसेच सावदा पोलीस स्टेशनचे सर्व अंमलदार यांचे मनःपूर्वक आभार."
एकता मित्र मंडळ फुलगांव ,नातेवाईक मित्र परिवार विविध सामाजिक माध्यम गृपवर त्यांचे अभिनंदन होत आहे .
पोलीस विभाग जळगांव यांनी माझ्या उत्कृष्ठ कार्याची दखल घेऊन जो सन्मान केला निश्चित अधिक कार्यप्रवण होण्यासाठी मला बळ मिळाले आहे असे मत सन्मानार्थी सुनिल कुरकुरे यांनी व्यक्त केले .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.