Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


साकेगाव शिवारात रेल्वे लाईनवर अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला

साकेगाव शिवारात रेल्वे लाईनवर अज्ञात इसमाचा मृत्यु

भुसावळ (प्रतिनिधी ) भुसावळ तालुका पोलीस स्टेशन हद्दीत साकेगाव शिवारात रेल्वे लाईनवर अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्याची घटना १४ मे रोजी उघडकीस आली आहे .
याबाबत पोलीस सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार  अकस्मात मृत्यु मधील खबर देणार सफौ आर.पी.एफ. दिपक कवळे नेमणुक भुसावळ आर. पी. एफ. यांनी पोलीस स्टेशनला खबर दिली की, भादली-भुसावळ अप रेल्वे लाईनवरील खंबा क्रमांक 440/12 या ठिकाणी एक अनोळखी इसम रेल्वे अपघातात मरण पावला आहे .
 सदर अनोळखी मयत इसमाची ओळख पटविण्यासाठी त्यांचा मृत्यु देह ग्रामीण रुग्णालय भुसावळ येथे ठेवण्यात आलेला असुन पोलीस विभागा मार्फत त्यांचे नातेवाईक व वारस यांचा शोध होणे बाबत आवाहन करण्यात आले आहे. सदर मयत अनोळखी इसमाचे वर्णन खालीलप्रमाणे आहे
 पुरुष जातीचा इसम , वय अंदाजे ३५ ते ४० वर्ष, रंगाने गोरा, उंची अंदाजे ५ फुट ५ इंच.  ,केस काळे अंगात पांढ-या रंगाचा फुल बाहीचा शर्ट, जांभळ्या रंगाची नाईट पॅन्ड, पायात YONEX कंपनीचा शुज घातलेला असे वर्णन असुन सदर अनोळखी इसमाची ओळख पटविणेसाठी आवाहन करण्यात आले आहे .
भुसावळ तालुका पोलीस स्टेशन अकस्मात मृत्यु रजिष्टर नंबर 12/2025 भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 194 प्रमाणे दिनांक 14/05/2025 रोजी दाखल करण्यात आलेली आहे. अधिक तपास पो .हे कॉ .  वाल्मीक जयराम सोनवणे करीत आहेत .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.