Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


थोरगव्हाण येथील डी एस देशमुख विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात संपन्न




थोरगव्हाण (ता. रावेर) | दि. 1 मे 2025
डी. एस. देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, थोरगव्हाण येथे महाराष्ट्र दिनानिमित्त भव्य ध्वजवंदन समारंभ संपन्न झाला. संस्थेचे अध्यक्ष  चंद्रकांत सुशिलाबाई जनार्दन चौधरी यांच्या शुभ हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष  उमाकांत बाऊसकर, संचालक  रवींद्र चौधरी, मुख्याध्यापक  एस. एस. वैष्णव, पर्यवेक्षक  डी. के. पाटील, क्रीडा शिक्षक  जे. ए. चौधरी, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीताचे व महाराष्ट्र राज्यगीत गायन झाले व देशभक्तिपर घोषणा देण्यात आल्या. या प्रसंगी शाळेच्या प्रांगणात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक श्री जितेंद्र चौधरी यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन शाळेच्या शिक्षकांनी समर्थपणे पार पाडले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.