Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


थोरगव्हाण येथील डी एस देशमुख हायस्कूल चा निकाल ८४ .९८ टक्के

"दी एज्युकेशन सोसायटी" संचलित थोरगव्हाण येथील देशमुख विद्यालयात: कोळी हर्षदा बाळू प्रथम , मानसी निलेश पाटील समाजशास्त्रात सर्वाधिक ९८ गुण .

प्रभावी कॉपीमुक्त अभियानात डी. एस. देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, थोरगव्हाणचा इ. १० वी मार्च २०२५ चा ऑनलाईन निकाल ८४.९८% लागला आहे. 
शाळेतील कोळी हर्षदा बाळू हिने ९१. ८०% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. पाटील कुशल भरत (९०.६०%) दुसऱ्या क्रमांकावर तर पाटील ममता बाळू (८९.६०%) तिसऱ्या क्रमांकावर आहे.

विषयानुसार प्रथम क्रमांक मिळवणारे विद्यार्थी:

मराठी: कोळी हर्षदा बाळू – ९० गुण

हिंदी: कोळी हर्षदा बाळू, पाटील कुशल भरत, पाटील सुवर्णा प्रमोद, बाऊस्कर प्रांजल गुणवंत – ८६ गुण

इंग्रजी: धनगर खुशी प्रवीण – ८९ गुण

गणित: पाटील ममता बाळू – ९५ गुण

विज्ञान: पाटील कुशल भरत – ९४ गुण

समाजशास्त्र: पाटील मानसी निलेश – ९८ गुण


या घवघवीत यशाबद्दल दी एज्युकेशन सोसायटी, थोरगव्हाण (स्थापना १९१७) चे अध्यक्ष चंद्रकांत चौधरी, उपाध्यक्ष उमाकांत बाऊस्कर, सचिव पवन चौधरी, सहसचिव रामराव देशमुख, तसेच सर्व संचालक मंडळाच्या बंधु-भगिनींनी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या तसेच विविध विषयांत सर्वोच्च गुण मिळवणाऱ्या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थे तर्फे विशेष अभिनंदन केले आहे.

विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. एस. वैष्णव, पर्यवेक्षक डी. के. पाटील, ज्येष्ठ शिक्षक टी. पी. घुले, तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालकवर्ग यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.