Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


निंभोरा येथे भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांची जयंती संपन्न

"" निंभोरा येथे महात्मा फुले आणि डॉ. आंबेडकर यांची संयुक्त जयंती उत्सव जल्लोषात साजरी**
 भुसावळ तालुक्यातील
निंभोरा बु  येथे महात्मा जोतीराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून आज जयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात गावातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते. 

उत्सवाची सुरुवात मान्यवरांच्या पुष्पांजलीने व सामुहिक वंदना घेऊन करण्यात आली. यावेळी महात्मा फुले आणि डॉ. आंबेडकर यांच्या कार्याची व विचारांची महत्ता सांगणारे जय जिजाऊ ब्रिगेड च्या जिल्हा सदस्या व प्राध्यापक निता पाटील , भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा सचिव प्राध्यापक प्रीतीलाल पवार, ग्रामविकास अधिकारी संजय भारंबे यांनी महापुरुष च्या जीवनावर भाषण केले .
कार्यक्रमात प्रमुख उपस्थितीत मध्ये एन.टी.इंगळे.प्रभाकर साळवे, यासिन पठाण, दिलीप बऱ्हाटे, दिनेश इखारे, रमेश खंडारे, सन्नी चाहेल, इत्यादी मान्यवर उपस्थित चे समिती कडून स्वागत करण्यास आले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी समितीचे अध्यक्ष मनिष सुरवाडे, सचिव किरण हातोले, संघटक अजय वाघ, गौरव नरवाडे, सागर नाईक, प्रणव मेश्राम, तरुण गवई, जानवी नरवाडे, पीयुष भालेराव, चक्रधर यावलकर, विकास खंडारे, यांच्यासह गावातील इतर नागरिकांनी सहकार्य केले.
गेली आठ दिवसापासून विविध लहान मुला व मुलींनी  सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
      उत्सव समितीचे सल्लागार प्रकाश सरदार  यांनी आपल्या भाषणात महात्मा फुले व डॉ. आंबेडकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकला आणि त्यांच्या विचारधारेचे महत्व व आजच्या काळात त्यांचा आदर्श अनुसरण करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमात विश्वरत्न महिला मंडळ यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन कार्यक्रमात वंदना घेतली.
कार्यक्रमाच्या समारोपासाठी उपस्थित सर्व मान्यवरांनी त्यांच्या भावना व्यक्त करताना दोन्ही समाजसुधारकांच्या विचारांचे पालन करण्याचे महत्व सांगितले. यावेळी शेकडो लोकांनी उत्सवात सहभाग नोंदवला आणि सामाजिक एकता व समतेचा संदेश मोठ्या प्रमाणात दिला.उत्सवाच्या यशस्वीतेसाठी सर्व आयोजक संयुक्त जयंती उत्सव समिती ने विशेष दाद देण्यात आली, तसेच येणाऱ्या काळात याप्रकारचे कार्यक्रम अधिक प्रमाणात राबवण्याचे आश्वासन देण्यात आले. शेवटी आभार कल्पना प्रधान यांनी केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.