Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


भुसावळ येथील गाडगे बाबा हिंदी महाविदयालयात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

** गाडगेबाबा हिंदी महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी: 
 भुसावळ ,श्री संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालयात, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्राचार्य डॉ. रमेश जोशी यांनी डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन केले व आपली भाव सुमने अर्पण केली. याप्रसंगी कॉलेजमधील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही प्रतिमेचे पूजन केले आणि मानवंदना दिली .प्राचार्य डॉ. रमेश जोशी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, भारताच्या संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तळागाळातल्या लोकांच्या उद्धारासाठी आपले संपूर्ण जीवन वेचले. त्यांनी तळागाळातील लोकांना त्यांचे अधिकार प्राप्त करून दिले. त्यांच्या जीवनात प्रकाश आणला.प्राचार्यांनी त्यांच्या संपूर्ण जीवन कार्यावर त्यांनी प्रकाश टाकला .सर्वांना समान अधिकार मिळाले पाहिजे हाच त्यांचा ध्यास होता . बाबासाहेबांच्या जयंती निमित्ताने महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जीवन परिचय व त्यांचे कार्य या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली. त्यात ४० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला व उत्कृष्ट निबंध लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात येणार आहे. सर्व प्राध्यापकांनी कार्यक्रमास उपस्थित राहून मानवंदना दिली. या प्रसंगी उपस्थीत विद्यार्थी यांनी देखील पुष्पें अर्पण केली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.