थोरगव्हाण येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी- 'डी. एस. देशमुख विद्यालय' व 'दी एज्युकेशन सोसायटी'चा पुढाकार
थोरगव्हाण येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ‘ ‘दी एज्युकेशन सोसायटी, थोरगव्हाण’ संचलित डी एस देशमुख विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष श्री. उमाकांत बाऊस्कर अध्यक्षस्थानी होते. तर प्रमुख पाहुण्या म्हणून थोरगव्हाण ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच सौ. रेखा शालिक तायडे या उपस्थित होत्या. सर्व मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन केले.
विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक श्री. डी. के. पाटील यांनी देखील प्रतिमापूजन केले व आपल्या भाषणातून डॉ. बाबासाहेबांचे शैक्षणिक, सामाजिक व संविधानिक योगदान यावर सविस्तर प्रकाश टाकला. “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा बाबासाहेबांचा प्रेरणादायी मंत्र त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितला.
या कार्यक्रमात महाराष्ट्र नशाबंदी मंडळाचे सदस्य व ‘दी एज्युकेशन सोसायटी’चे अध्यक्ष श्री. चंद्रकांतदादा चौधरी यांच्या वतीने व्यसनमुक्ती, तंबाखू व अमली पदार्थविरोधी जनजागृतीपर फ्लेक्स व परिपत्रके गावातील युवक व विद्यार्थ्यांमध्ये वाटण्यात आले. संस्थेचे संचालक श्री. रवींद्र काशिनाथ चौधरी यांचीही उपस्थिती लक्षणीय ठरली.
कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन श्री. वाय. जे. कुरकुरे यांनी केले. कार्यक्रमाला ज्येष्ठ शिक्षक श्री. टी. पी. घुले, के. पी. चौधरी, जे. ए. चौधरी, पी. सी. कचरे, सौ जे. पी. चौधरी, एम. के. पाटील, एन. बी. चौधरी, सौ एन. डी. पाटील, के. एम. पाटील, एस. पी. पाटील, एन. ए. देशमुख, लेखनिक आर. के. वानखेडे, शिपाई एस. पी. झोपे, . अक्षय तायडे तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.