भुसावळ शहरातील प्रभु श्रीरामजी नवमी निमित्त श्रीसाईबाबा मंदीर पालखी सोहळ्यात नामदार रक्षाताईची उपस्थिती लाभली .
प्रभु श्रीरामजी दर्शन झाल्यानंतर जामनेर रोड वरील श्री संत गजानन महाराज मंदिर समोरील गोसेवा केंद्र याठिकाणी देखील भेट दिली गोसेवा केंद्रात कत्तली पासुन वाचविलेल्या व जख्मी गोमातेच्या रक्षण सेवेबरोबर इतर मुक्या जीवांची देखील सेवा उत्कृष्ट प्रकारे होते ताईंनी दखल घेतली आहे .
गोभक्त श्री मुन्नाजी बेहरा यांनी सांगितले पुर्णवेळ गोरक्षणांचे कार्य निस्वार्थी भावनेने सुरू आहे .
ताईंनी रोहीत महालेंना विचारले आपली संस्था आहे का नाही ताई म्हणत आर्थिक क्षमता नाही 3 वर्षे पादत्राणे सोडले तेव्हा गोरक्षणांची तळमळ बघत गोभक्त योगेश पाटील यांनी खाजगी जागा अपघात ग्रस्त गोमातेच्या उपचारा साठी दिली आहे .
देव परत्मामा बालपणापासुन मुके जीव वाचविण्याचे कार्य करुन घेतात गोमाता व मुक्या जीवांच्या कल्याणासाठी संस्था करायची आहे जेणेकरून भविष्य काळात मुक्या जीवांसाठी दवाखाना उघडण्याचे स्वप्नं आहे जेणेकरून प्रत्येक जख्मी गंभीर आजारी जीवांचे प्राण वाचतील या पवित्र कार्याचे ताईंनी कौतुक करत सद्देव गोसेवा कार्यात सोबत आहे ताईंना महालेंनी ह्रदयापासुन धन्यवाद देत देवांचे आभार मानले .
यावेळी क्रीडामंत्री श्रीमती रक्षाताई खडसे , साईसेवक पिन्टुभाऊ कोठारी श्री मुन्नाभाऊबेहरा श्री विनोद भाऊ चोरडीया हर्षल सपकाळे अनिरुद्ध कुलकर्णी रोहित महाले व समस्त गोसेवक बांधव उपस्थित होते