संस्कारमाला पुष्प 5 वे मुलांच्या जडणघडणीत आईचे स्थान महत्त्वाचे – सौ. आरती चौधरी यांचे मार्गदर्शन
थोरगव्हाण (ता. भुसावळ) – डि. एस. देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, थोरगव्हाण येथे सुरु असलेल्या उन्हाळी संस्कारमाला शिबिराच्या पाचव्या पुष्पात “मुलांच्या शालेय जडणघडणीत आईचे स्थान” या विषयावर मार्गदर्शनपर सत्र आयोजित करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या सौ. आरती सारंग चौधरी, समुपदेशक व समाजसेविका (भुसावळ) यांनी आईच्या भूमिकेचे महत्व स्पष्ट करताना सांगितले की, "आई हीच मुलांची पहिली गुरू असते. तिच्या सान्निध्यात संस्कार रुजतात. घरातील वातावरण व आईचे विचार मुलांच्या शालेय यशात मोठी भूमिका बजावतात." आईच्या सेवेचे ऋण आपण कधीच फेळू शकत नाही . आईच्या न्यायालयात बाळाचे लेकरांचे सर्व गुन्हे माफ होतात . आईचे ऐका , म्हणणे टाळू नका मोठे व्हा .राजमाता जिजाऊ यांनी आदर्श शिवरायांना घडवले हे उदाहरण देवून विद्यार्थ्यांना सांगितले . मातृहृदयी सानेगुरूची आईच्या संस्कारामुळे घडले तेव्हा विद्यार्थ्यांचे डोळे पाणावले .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सदाशिव बालकराम झांबरे, माजी सरपंच गाते व शाळेचे माजी विद्यार्थी (1980 बॅच) होते. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, "आईच्या मार्गदर्शनामुळेच मुलामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. आजही ग्रामीण भागातील मातांचा मुलांच्या घडणीत मोठा वाटा आहे." आईचा महिमा व्यक्त करतांना सदाशिव झांबरे यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली . सभागृहात भावनिक वातावरण निर्माण झाले .
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींच्या स्वागतगीताने झाली. सरस्वती पूजन अध्यक्ष झांबरे यांच्या हस्ते पार पडले. प्रास्ताविक प्रभारी मुख्याध्यापक . डी. के. पाटील यांनी केले. प्रमुख पाहुण्यांमध्ये सौ. सरिता गणेश पाटील (लोकनियुक्त सरपंच, गाते). सारंग व्ही. चौधरी (आर्किटेक्ट, भुसावळ) व गणेश पाटील यांचा समावेश होता.
संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत चौधरी व संचालक. रविंद्र काशिनाथ चौधरी यांची यावेळी उपस्थिती लाभली मनोगत व्यक्त केले. आभार प्रदर्शन प्रभारी मुख्याध्यापक डी. के. पाटील यांनी केले.
पुष्प ६ वे
थोरगव्हाण येथे “संस्कार – काळाची गरज” या विषयावर विचारप्रवृत्त सत्र संस्कारमाला शिबिर – पुष्प ६ विद्यालयात उत्साहात पार पडले
थोरगव्हाण (ता. भुसावळ) | दि. १७ एप्रिल – डी. एस. देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, थोरगव्हाण येथे सुरू असलेल्या उन्हाळी संस्कारमाला शिबिरा अंतर्गत सहाव्या पुष्पाचे आयोजन उत्साहात पार पडले. “संस्कार – काळाची गरज” या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
या सत्राचे प्रमुख वक्ते श्री मनोज महाराज चौबे (नांदुरा) होते. आपल्या प्रभावी व संवादी शैलीत त्यांनी संत तुकडोजी महाराज रचित ग्रामगीताचा संदर्भ देत श्रमसंस्कार, स्वच्छता, समाजसेवा, सद्वर्तन व ग्रामीण जीवनमूल्यांचे महत्त्व पटवून दिले.
> “ग्रामगीता ही केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक जागृती करणारा ग्रंथ आहे. गुणपत्रिका कितीही चांगली असली तरी आचार-विचारात संस्कार झळकले पाहिजेत,” असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
त्यांनी संस्कारांचा समाजहितासाठी असणारा उपयोग आणि मुलांमधील नैतिक मूल्यांची वाढ याबाबत मार्गदर्शन करत “संस्कारमाला शिबिर ही काळाची खरी गरज आहे,” असे ठाम मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष पवन हेमंतराव चौधरी (सचिव, द एज्युकेशन सोसायटी, थोरगव्हाण) यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले,
> “विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक प्रगतीसोबतच नैतिकतेचे, मूल्यांचे आणि संस्कारांचे शिक्षण गरजेचे आहे. हे शिबिर म्हणजे अशा सकारात्मक बीजारोपणाची प्रेरणा आहे.”
त्यांनी वक्त्यांचे मनापासून अभिनंदन करत शाळेतील सर्व शिक्षक, आयोजक व पालकांचे आभार मानले.
प्रमुख पाहुणे म्हणून
संतोषभाऊ सुरवाडे (पोलीस पाटील, करंजी),
भागवत राव सनानसे (माजी विद्यार्थी, पुणे),
डी. एस. सोनवणे (माजी विद्यार्थी, जळगाव) यांची उपस्थिती लाभली.
शिबिरात सहभाग प्रमाणपत्र वितरण मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले . कलासंचनालय तर्फे घेण्यात येणाऱया एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षांचे प्रमाणपत्र वितरण संपन्न झाले कलाशिक्षक एस बी सपकाळे यांनी परीक्षेचे मार्गदर्शन व नियोजन केले होते .
प्रभारी मुख्याध्यापक डी. के. पाटील यांनी प्रमुख वक्त्यांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पी. सी. कचरे यांनी समर्थपणे पार पाडले.
कार्यक्रमास द एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री चंद्रकांत जनार्दन चौधरी, उपाध्यक्ष उमाकांत वसंत बावस्कर, संचालक रवींद्र काशिनाथ चौधरी, तसेच वाय. जे. कुरकुरे, के. पी. चौधरी, जे. ए. चौधरी, एम. के. पाटील, सौ जे. पी. चौधरी, एन. बी. चौधरी, सौ एन. डी. पाटील, एस. बी. सपकाळे, एस. पी. पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
शाळेतील लिपिक आर. ए. चौधरी, शिपाई योगेश झोपे व अक्षय तायडे यांचे विशेष सहकार्य लाभले.
हा सत्र विद्यार्थ्यांच्या मनात संस्कारांचे बीज रोवणारा, विचार जागवणारा आणि जीवनमूल्यांशी जोडणारा ठरला.
सत्र भावनिक आणि विचारप्रवर्तक ठरले. पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांनी या सत्रातून मुलांच्या घडणीत घरच्या वातावरणाचे महत्त्व जाणले.