Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


वरणगांव येथील सुशिल राम कदम प्राथमिक विद्यालयात बक्षीस वितरण समारंभ संपन्न

श्रीनाथ एज्युकेशन सोसायटी द्वारा संचलित सुशीला राम कदम प्राथमिक विद्यामंदिर वरणगाव येथे दिनांक 9 एप्रिल 2025 रोजी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सेक्रेटरी मा.श्री. किशोर रवींद्रनाथ झोपे तर प्रमुख पाहुणे शाळेचा माजी विद्यार्थी अक्षय राम चौधरी संस्थेचे जॉईन सेक्रेटरी मा.श्री.अमित रत्नाकर चौधरी संचालक मा.श्री.मोरेश्वर  पद्माकर फिरके, गंगाधर सांडू चौधरी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. एम आर चौधरी सर तसेच पर्यवेक्षक अविनाश देशमुख सर सुशीला राम कदम प्राथमिक विद्या मंदिराच्या मुख्याध्यापिका श्रीमती संगीता संजय चौधरी मॅडम तसेच पालक शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष किरण पाटील दादा यांची सर्वांची उपस्थिती होती 

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सरस्वती मातेच्या व नाथांच्या प्रतिमेस हार अर्पण करून झाली. प्रसंगी मुख्याध्यापिका श्रीमती संगीता संजय चौधरी मॅडम यांनी प्रास्ताविक संभाषणामध्ये कार्यक्रमाची पूर्ण रूपरेषा सांगितली. प्रमुख पाहुण्यांच्या भाषणामध्ये अक्षय राम चौधरी यांनी विद्यार्थ्यांनी पुढील आयुष्यात ध्येय कसे गाठावे हे सांगितले त्याचप्रमाणे शाळेसाठी १११११  रुपये ही रोख रक्कम देणगी म्हणून दिली तसेच पुढील शैक्षणिक वर्षापासून प्रत्येक वर्गात  प्रथम येणाऱ्या १०१ रुपये, द्वितीय येणार येणाऱ्यास ७१ रुपये ,तृतीय येणाऱ्यास ५१ रुपये असे बक्षीस जाहीर केले आणि प्रत्येक वर्गातून एक असे एकूण चार गरीब व  होतकरू विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी शालेय गणवेश देण्याचे जाहीर केले आणि विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा हे सांगितले. त्याचप्रमाणे गंगाधर सांडू चौधरी माध्यमिक विद्यालयाचे  मुख्याध्यापक श्री. एम आर चौधरी सर यांनी सुद्धा इयत्ता पहिली ते तिसरी प्रथम येणाऱ्यास  १०१ रुपये  व इयत्ता चौथीतून प्रथम येणाऱ्यास २५१ रुपये असे बक्षीस जाहीर केले व विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले .
 सूत्रसंचालन विजयकुमार प्रभाकर झोपे यांनी तर आभार योगिता सुनिल वसावे यांनी मानले
 कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी सहकार्य केले .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.