Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


कुऱ्हे पानाचे येथे सी सी टीव्ही कॅमेऱ्या चे उदघाटन


कुऱ्हे येथे ग्रामपंचायत तर्फे  सी सी टिव्ही कॅमेऱ्यांचे उदघाटन 

    भुसावळ तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील कुऱ्हे (पानाचे) गावी ग्रामपंचायत ने 15 व्या वित्त आयोग निधीतून 5 लाख रुपये खर्च करून गावात 10 CCTV कॅमेरा बसविण्यात आले असून सदर ठिकाणी CCTV कॅमेरे बसविणे बाबत आपण ग्रामपंचायत ला पत्र दिले होते .
त्याला प्रतिसाद देऊन त्यांनी ग्रामपंचायत मध्ये ठराव करून सदरचे CCTV बसविण्यात आले आहे. 


    कार्यक्रमाचे उद्घाटन महेश गायकवाड तालुका पोलीस  निरीक्षक यांच्या हस्ते संपन्न झाले , या प्रसंगी  . दुर्गाबाई सुरेश शिंदे सरपंच ,
 जीवन पाटील , रामलाल बडगुजर,
  समाधान  पवार , सुरेश शिंदे ,संतोष मोरे आदी उपस्थित होते .

   सदरचे  कॅमेरे १५ व्या  वित्त आयोग निधीतून बस स्टंड  चौकात चौफुली व इतर ठिकाणी असे  २० अत्याधुनिक कॅमेरे बसविण्यात आले आहेत .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.