Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


भुसावळ येथे जय गणेश जेष्ठ नागरिक संघातर्फे हनुमान जन्मोत्सव साजरा

भुसावळ दि.12 येथील श्री जय गणेश ज्येष्ठ नागरिक संघ भुसावळ  येथे हनुमान जयंती निमित्त प्रमुख पाहुणे म्हणून  श्री ज्ञानदेव इंगळे होते.   

प्रथम त्यांच्या शुभ हस्ते श्री गणेश पूजन व स्व .अरुण मांडळकर सरांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले . श्री ज्ञानदेव इंगळे यांचा सत्कार संघाच्या अध्यक्षा सौ सुधा ताई खराटे यांनी  गुलाब पुष्प व रुमाल देऊन सन्मान करण्यात आला. 
प्रमुख वक्त्यांचा परिचय श्री सुपडू कुरकुरे यांनी करून दिला या प्रसंगी श्री ज्ञानदेव इंगळे यांनी संकट मोचन हनुमान यांच्या जयंतीनिमित्त भगवान हनुमान यांच्या जीवनातील प्रसंग कथन करताना त्यांचा आदर्श आपण जीवनात आचरणात आणावा असे आवाहन केले त्यांच्या जन्मदिवसाला जयंती न म्हणता जन्मोत्सव म्हणावे कारण जयंती अशा व्यक्तीसाठी म्हटले जाते जे हयात नाहीत
 भगवान हनुमान सप्तचिरंजिवापैकी एक असून ते कलियुगातील जिवंत किंवा जागृत देवता मानले जातात हनुमानाच्या जन्माची कथा विष्णुपुराण वाल्मिकी रामयणात लिहिलेली आहे वाल्मिकी रामायणात हनुमानाचे चरित्र सुंदर कांड युद्ध कांड व उत्तरकांडात वर्णन केलेले आहे

 हनुमान रामायणातील एक अमूल्य रत्न असुन ते एक महान विद्वान होते त्यांना व्याकरणाच्या नऊ शाळा चार वेद आणि सहा शास्त्रे माहीत होती त्यांना ज्ञान असल्याचा अभिमान नव्हता ते खऱ्या प्रामाणिकपणा आणि ज्ञानातून निर्माण झालेल्या नम्रतेचे प्रतिबिंब होते त्यांना जाणवले की राम तत्व आत्माराम प्रत्येक जीवाला प्रकाशित करत आहे त्यांनी कधीही फायदे आणि तोटे मोजले नाहीत आत्मविश्वास त्यांच्या धैर्याचा आधार होता जीवनात             
  आत्म समाधान, आत्मत्याग आणि आत्मसाक्षात्कार यांचा आनंद श्रीरामाच्या असीम भक्तीने घेत राहिले. प्रत्येक स्त्रीला ते आपल्या आई समान मानत असत त्यामुळेच ते सीतामातेचा शोध लावू शकले              प्रभू श्रीरामाची भक्ती त्यांच्या रोमा रोमात भिनली होती.           
प्रभू श्रीरामांच्या राज्याभिषेकानंतर  हनुमान यांना माता सीतेने आपला नवरत्नाचा मोत्याचा हार भेट दिला त्यावेळी त्यांनी सर्व मोती वेगळे आणि दाताने चावून त्यात राम आहे का बघितले आणि त्यांना एकही असा मोती सापडला नाही की त्यात राम आहे जर त्यात राम नसेल तर ते माझ्यासाठी निरुपयोगी दगडच आहेत वाल्मिकी रामायणाआधी  रामायण श्री हनुमान यांनी हिमालयात तपश्चर्यदरम्यान एका विशाल पाषाणावर आपल्या नखांनी लिहिले होते ते "हनुमद रामायण" नावाने ओळखले जाते असा उल्लेख आहे .जिथे जिथे रामाची कथा सुरू असते तिथे आजही श्री हनुमान दुसऱ्या वेशात आवर्जून हजर असतात अशी श्रद्धा आहे जर आपण मनोभावे  हनुमानाची उपासना  हनुमान चालीसाचे पठण केल्यास आपल्यातील शनीची साडेसाती आणि ग्रहापासून संरक्षण भीती नकारात्मकता मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारते तसेच घरातील वातावरण सकारात्मक राहते शेवटी  अभंग भजन आणि सामूहिक हनुमान चालीसा चे पठण केले गेले संघाच्या अध्यक्षा सौ सुधाताई खराटे यांनी आपल्या मनोगतात सांगितले हिंदू संस्कृतीला परंपरा असून श्री हनुमानाचा आदर्श समोर ठेवावा सभेचे सूत्रसंचालन श्रीमती विद्याताई रामवंशी यांनी केले आभार  श्री सुरेश पाटील यांनी मानले कार्यक्रमाचे छायाचित्रण श्री प्रकाश तायडे यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संघ कार्यकारणी व संघातील सर्व सदस्यांनी सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.