[ मनोहर लोणे भुसावळ ]
भुसावळ शहरात अनेक दिवसांपासून शुद्ध, स्वच्छ पाणी पुरवठा नगरपालिका करत नाही. या कामासाठी ५ कोटीचा ठेका दिलेला आहे. मात्र दीड वर्ष होऊनही ते काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा होत नाही.
तसेच अमृत योजनेचा निधी मंजूर होऊन आणि सहा महिने झाले तरी कामाला सुरुवात झालेली नाही.
या कामांना गती मिळणे आवश्यक आहे. पाणी पुरवठा झाला तर नगरसेवक, लोकप्रतिनिधींना आंदोलन करून पाणी वगैरे फेकण्याची वेळ येणार नाही. सत्ता पक्षाच्या लोकांना मोर्चा, आंदोलन करायची वेळ येणे म्हणजे सरकार चे अपयश आहे.
म. प्रांत व मुख्याधिकारी यांनी याबाबतीत त्वरित दखल घेऊन पाणी पुरवठा वेळेवर व शुद्ध, स्वच्छ करावा अन्यथा पुन्हा आंदोलन करावे लागेल असा इशारा देण्यात आला आहे.
याप्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख निलेश महाजन, उपजिल्हा प्रसिध्दीप्रमुख व माजी नगरसेवक दिलीप सुरवाडे, उप शहर प्रमुख शरद जयस्वाल, योगेश बागूल, दीपक सुर्यवंशी आदी पदाधिकारी उपस्थित होते.