येथील आयुध निर्माणी भुसावळ येथे 18 मार्च आयुध निर्माणी दिवस सर्व कर्मचाऱ्यांनी उत्साहात साजरा केला. आयुध निर्माणी जे देशाच्या सुरक्षेसाठी लागणारे विभिन्न प्रकारचे अस्र-शस्त्र, दारुगोळा निर्माण करण्याच कार्य करीत असून आयुध निर्माणींना आज 221 वर्षाची परंपरा लाभलेली आहे. भारत देशाच्या प्रमुख चार युद्धे हे आपण आयुध निर्माणीत तयार झालेल्या शस्त्र व दारुगोळयाच्या हिमतीवर जिंकलेले आहेत. भारत देशात दारूगोळा व आवश्यक शस्त्र निर्मिती साठी देशातील 41 निर्माणींना प्राधान्य देण्यात येते. अशातच सरकार द्वारा निगमीकरणाच्या माध्यमातून 41 आयुध निर्माणीचें ७ निगम तयार करून निगमीकरण करण्याचा निर्णय घेतल्याने कर्मचाऱ्यांमध्ये कमालीची नाराजगी दिसून येते. 18 मार्च हा परंपरागत आयुध निर्माणी दिवस म्हणून साजरा केला जातो, परंतु सरकार द्वारे आयुध निर्माणी दिवसाचं कुठलंही आयोजन न केल्याने संरक्षण क्षेत्रात कार्यरत फेडरेशनच्या संयुक्त मोर्चाचे आदेशानुसार आयुध निर्माणी भुसावळ येथील स्थानिक सर्व युनियन- असोसिएशनच्या संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून 18 मार्च आयुध निर्माणी दिवस उत्साहात साजरा केला गेला. सकाळी मुख्य द्वार येथे 18 मार्च आयुध निर्माणी दिवस चिरायू हो चे बॅचेस लावण्यात आले. सकाळी साडेनऊ वाजता चहा अवकाशात सर्व कर्मचारी औद्योगिक कॅन्टीन येथे एकत्र जमून त्या ठिकाणी आयुध निर्माणीचे अस्तित्व जपण्यासाठी कटिबध्द राहण्याबाबत व आयुध निर्माणींना अधिक सशक्तीकरण करण्यासाठी योगदान दिले जाईल बाबत शपथ ग्रहण केली.
सर्व कर्मचाऱ्यांनी एकमेकांना आयुध निर्माणी दिवसाच्या शुभेच्छा देत आयुध निर्माणी दिवस यशस्वीरिता साजरा केला गेला. सर्व युनियन असोसिएशनचे पदाधिकारी त्यात प्रामुख्याने कॉ. आशिष मोरे, निलेश देशमुख, दिनेश राजगिरे, किशोर पाटील, आमोद भारंबे, किशोर सूर्यवंशी, सुजित देवगिरीकर, प्रकाश नेमाडे, किशोर चौधरी, दिपक सपकाळे, संजय अहिरे, विनोद सोना तायडे, नितेश तायडे, राजकिरण निकम, विनोद पवार सुनील बाविस्कर, संजय दांडगे सह अन्य पदाधिकारी, सभासदांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान दिले. अशी माहिती दिनेश राजगिरे यांनी दिली आहे