Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


दलदलीत अडकलेल्या निलगायीला गोरक्षक व वनकर्मचारी यांनी बाहेर काढले

अखेर गंभीर जख्मी नील गायीला दलदलीच्या डबक्यातुन सुखरूप बाहेर काढले असता काही वेळाने नीलगाय ने सोडले प्राण

 दिनांक 17/3/25 रोजी संध्याकाळी  नील गाय खोल दलदलीच्या डबक्यामध्ये पडलेली आहे वनविभागातील कर्मचारी श्री तुषार भोळे यांनी शहरातील गोसेवक महालेना कळविले होते .
रोहीत महाले यांनी  घटनास्थळी धाव घेत गोभक्तांच्या मदतीने तीला बाहेर काढले बाहेर काढले असता मीत गायीला जेवण न मिळाल्याने अशक्तपणामुळे आणि डावा पायाला गंभीर ईजा दिसुन आली होती व  पाय निकामी झाल्याने बाहेर येण्यासाठी बर्राच प्रयत्न केला असावा असे  दिसले .
परिसरातील पवन अवतारे यांना ही गाय पडलेली दिसली त्यांनी वनविभागाची सम्पर्क साधला रात्री नगरपालीकेतील  जेसीबी च्या मदतीने तिला जमीनीत पुरत अंतिम संस्कार केला .
 परिसरातील वन्यजीव संकटात जख्मी असल्यास वनविभागाला कळवावे असे आवाहन  रोहित महाले यांनी केले आहे .
या कार्या साठी  वनसेवक नरेंद्र बारी वनसेवक तुषार भोळे  अवनी बहुउद्देशीय संस्था सर्पमित्र रोहित श्रीवास्तव बल्लु धायडे महेंद्र ब्राह्मणे रोहित महाले यांनी परिश्रम घेतले .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.