थोरगव्हाण प्रतिनिधी - मनोहर लोणे
रावेर तालुक्यातील थोरगव्हाण येथे २० मार्च २०२५ रोजी श्री माधवनाथ महाराज मंदिरात नाथ षष्ठीच्या निमित्ताने श्री दत्त महाराजांच्या पादुकांचे पूजन व रुद्राभिषेक संपन्न झाले. डोंबिवलीस्थित नाथ शिष्य श्री चंद्रकांत जनार्दन पाटील व सौ. मनीषा चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते हा अभिषेक सपत्नीक करण्यात आला.
परिसरातील रावेर, जळगाव, भुसावळ व थोरगव्हाण येथील अनेक नाथशिष्य आणि भाविक मोठ्या उत्साहात दर्शनासाठी उपस्थित होते. या पावन सोहळ्यानिमित्त इंदूरस्थित नाथशिष्य रोहित अशोक कोल्हे व सौ. प्रचिती रोहित कोल्हे यांच्या तर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
श्री माधवनाथ सेवा संघ, थोरगव्हाण यांच्या वतीने सर्व भक्तांना टी-शर्ट वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन नाथभक्त उमाकांत लोणे यांनी केले. यावेळी माधवनाथ सेवा संघाचे सचिव श्री वामन लक्ष्मण चौधरी, प्रशांत चौधरी, निलेश चौधरी व पंढरीनाथ तेजनकर उपस्थित होते.
पूजन व धार्मिक विधी पौरहित्य श्री उदय दीक्षित व त्यांच्या सहकारी मंडळाने पार पाडले.
-