भडगाव तालुक्यातील निंभोरा येथील. शेतकरी दिलीप धोंडू बाविस्कर यांचे मक्याच्या शेतात दुर्गंधी येत असल्याने कसली दुर्गंधी येत आहे याची शेतकऱ्यांनी पाहणी केली असता बऱ्याच दिवसांपासून पंचक्रोशीत हैदोस घालणारा बिबट्या हा दिनांक 10 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता मृत अवस्थेत आढळून आला होता.
सदर मयत बिबट्याच्या घटनेस्थळी वन विभागाचे अधिकारी पोहचले होते. त्यावर रात्रभर कॅमेरा निगराणी ठेवत आज दिनांक 11 मार्च मंगळवार रोजी सकाळी 11:00 वाजता भडगाव पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल गायकवाड व गिरड येथील पशु वैद्यकीय अधिकारी सायली देशपांडे यांनी बिबट्या चे शव विच्छेदन केले असून नमुन्यांची तपासणी झाल्यानंतरच बिबट्या मृत झाल्याचे कारण स्पष्ट होईल, सहाय्य्क वनसंरक्षक ए पी पंडित यांच्या निगराणीत वन अधिकारी व कर्मचारी यांनी बिबटयास अग्नी डाग देत अंत्यसंस्कार केले.
यावेळी सहाय्यक वनसंरक्षक ए पी पंडित, वन क्षेत्रपाल ए एस मुलांनी भडगाव पशु वैद्यकीय अधिकारी डॉ विशाल गायकवाड गिरड पशु वैद्यकीय अधिकारी डॉ सायली देशपांडे, वनपाल नंदू पाटील,वनरक्षक डी एस वानखेडे, वनरक्षक मुकेश भोसले, वनसेवक छोटू पाटील, वनसेवक आजमल राठीड, ड्राइवर सचिन कुमावत, सर्पमित्र हर्षल भदाणे हे उपस्थित होते.