Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


लोकशाहीच्या रक्षणासाठी एन ए पी एमचे नेतृत्व सक्रीय - चंद्रकांत चौधरी

लोकशाहीच्या रक्षणासाठी एनएपीएमचे नेतृत्व सक्रिय:जेष्ठ नेते चंद्रकांत चौधरी यांचे मत .


हैदराबाद येथे आयोजित नॅशनल अलायन्स ऑफ पीपल्स मूव्हमेंट्स (NAPM) च्या अखिल भारतीय अधिवेशन नर्मदा बचाव आंदोलनाच्या मेधाताई पाटकर यांचे नेतृत्व व मार्गदर्शनात सुरू आहे . ज्येष्ठ नेते चंद्रकांत चौधरी (भुसावळ) यांनी लोकशाही आणि संविधानिक न्यायाच्या संरक्षणासाठी ठाम भूमिका मांडली.

"संविधानिक न्याय ते जलवायू न्याय" या संकल्पनेवर आधारित या अधिवेशनात अनेक महत्त्वाचे विषय चर्चिले गेले. पिंप्रीसेकम संघर्ष समिती प्रिंप्रीसेकम ता भुसावळ अध्यक्ष रमाकांत चौधरी यांनीही आपल्या भाषणातून शेतकरी, कामगार आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी लढण्याची गरज अधोरेखित केली.

या अधिवेशनात लोकशाहीच्या संरक्षणासाठी व्यापक चळवळ उभी करण्यावर भर देण्यात आला. NAPM च्या नेतृत्वाखाली देशभरातील संघर्षशील संघटनांनी एकत्र येऊन जनतेच्या हक्कांसाठी लढण्याचा निर्धार व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.