श्रीराम हौसिंग.सो . येथे स्तुत्य उपक्रम: स्व. प्रल्हाद दामोधर खाचणे यांचे स्मरणार्थ श्रीराम हौसिंग सोसायटी येथे आरामदायक बाकाची भेट .
दिव्य महाराष्ट्र प्रतिनिधी भुसावळ
एरव्ही प्रभागातीक नगरसेवक , स्थानिक आमदार शहरातील विविध गार्डन रस्ते चौफुली येथे स्थानिक निधीतून गरजू वाटसरू यांना बसण्यासाठी बाकाची सुविधा देतात पण रजत खाचणे यांनी पुढाकार घेत वडिलांचे स्मरणार्थ बाक सुविधा देवून एक आदर्श ठेवला आहे . या उपक्रमाचे कौतुक होत आहे .
स्वर्गीय प्रल्हाद दामोधर खाचणे (दूर्गा इंजिनिअरींग चे संचालक )यांच्या स्मरणार्थ श्रीराम हैसिंग सोसायटी भुसावळ येथे एक आरामदायक बाक बसवण्यात आला आहे. या उपक्रमासाठी ज्योती खाचणे आणि चिरंजिव रजत व जतिन खाचणे यांनी पुढाकार घेतला.
समाजोपयोगी कार्यात योगदान देण्याच्या उद्देशाने हा बाक सोसायटीच्या रहिवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या सुविधेमुळे रहिवाशांना बसण्यासाठी आणि आराम करण्यासाठी एक चांगले ठिकाण मिळणार आहे.
यावेळी उपस्थित नागरिकांनी खाचणे परिवाराच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. सोसायटीतील वयोवृद्ध तसेच इतर रहिवाशांसाठी ही एक उपयुक्त सुविधा ठरेल, असे मत सोसायटीच्या सदस्यांनी व्यक्त केले.