जि.प.प्राथमिक शाळा मांडळ येथे छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. गावात प्रभातफेरी काढण्यात आली.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री स्वप्निल नवल पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पुजन करण्यात आले. या परिसरात शिवरायांच्या जयघोष करण्यात आला. शाळेत महाराजांच्या प्रतिमेचे पुजन जि.प. शाळा मांडळ बॉइज शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय ताईसो. श्रीमती अल्काताई मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले .शिवरायांच्या विचारांची गरज आजच्या पिढीला प्रेरणादायी आहे या विषयी माहिती शाळेतील जेष्ठ शिक्षक नानासो. श्री.विकास पाटील सर यांनी सांगितली .शिवरायांवर पोवाडा सादर करण्यात आला या प्रसंगी दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक बंधू भगीनी सुनील शिरसाठ, सुनील सर, उपस्थित होते व विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर भाषण दिले
💐💐💐💐💐