*निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या पूर्व प्राथमिक विभागाचे स्नेहसंमेलन चिमुकल्यांच्या नृत्याविष्कारांनी गजबजले...
सतीश पाटील भडगाव तालुका प्रतिनिधी!*
पाचोरा :- तात्यासाहेब आर ओ पाटील नगर येथील निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या पूर्व प्राथमिक विभागाचे स्नेहसंमेलन अतिशय उत्साहात,जल्लोषात संपन्न झाले. या कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून शाळेच्या अध्यक्षा आदरणीय सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांची विशेष उपस्थित होते
राजस्थानी,पंजाबी, हिंदी, मराठी भाषेच्या गीतांवर लहान चिमुरड्यांच्या नृत्याविष्कारांनी उपस्थितांची मने जिंकली. मोबाईल,सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे समाजात विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे याबाबत जनजागृती करण्यासाठी लहान चिमुकल्यांनी आपल्या नृत्यातून प्रभावी संदेश देत त्याचे शारीरिक, मानसिक परिणामांसोबतच कुटुंबातील नातेसंबंध किती कमकुवत होत आहेत यावर उपस्थितांना विचार करावयास भाग पाडले व मनोरंजनातून समाज प्रबोधन देखील केले.
शाळेच्या अध्यक्षा आदरणीय सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांनी आपल्या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्त ,आत्मविश्वास, नेतृत्व क्षमता विकसित होतात व त्यांच्या कलागुणांना वाव मिळतो असे सांगितले.पालकांनी आपल्या पाल्यांना जास्तीत जास्त वेळ देऊन त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे. कौटुंबिक संवाद जास्त असेल तर ते आपोआपच मोबाईल व सोशल मीडियापासून दूर राहतील असे आपले मत व्यक्त केले.
याप्रसंगी शाळेच्या उपाध्यक्षा श्रीमती. कमलताई पाटील, शाळेचे जनसंपर्क अधिकारी श्री आय. बी. सिंग, शाळेचे प्राचार्य श्री. गणेश राजपूत, उपप्राचार्य श्री प्रदीप सोनवणे, समन्वयक सौ. स्नेहल पाटील, प्रशासकीय अधिकारी श्री.संतोष पाटील,पूर्व प्राथमिक विभागाच्या प्रमुख सौ वर्षा पाटील व फरीदा भारमल यांची उपस्थिती होती