Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


जय गणेश जेष्ठ नागरिक संघातर्फे मी सावित्री बोलतेय या नाटिकेचा मिनाक्षी वाघमारे यांचे सादरीकरण

श्री जय गणेश जेष्ठ नागरिक संघात *मी सावित्री बोलतेय* या विचार नाटिकेचे प्रा. मीनाक्षी वाघमारे द्वारा सादरीकरण
         भुसावळ येथील श्री जय गणेश जेष्ठ नागरिक संघाची सभा 27फेब्रुवारी रोजी घेण्यात आली .आरंभी प्रमुख पाहुण्या अरुणोदय ज्ञान प्रसारक मंडळ संचलित महिला महाविद्यालय, जळगाव येथील मराठी विषयाच्या प्रा. मीनाक्षी वाघमारे यांनी श्री गणेशाचे पूजन करून कै. अरुण मांडळकर सरांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. 
प्रमुख अतिथी यांचा परिचय सौ कुसुम पाटील यांनी करून दिला आजचा सुविचार श्री रामकृष्ण पाटील यांनी सांगितला संघाच्या अध्यक्षा डॉ सुधा खराटे यांनी प्रमुख अतिथी यांचा संघातर्फे शाल, अनुभूती नियतकालिक व  पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला 
      प्रा. मीनाक्षी वाघमारे यांनी *मी सावित्री बोलतेय* ही विचार नाटिका ओघवत्या शैलीत सादर केली. यात त्यांनी सावित्रीबाई फुले यांचे बालपण, विवाह ,ज्योतिरावंकडून मिळालेले शिक्षणाचे धडे, मुलींच्या शाळेत शिक्षिका म्हणून केलेला प्रवेश ,त्यांचा झालेला छळ ,ज्योतिरावांचे साहित्य, सामाजिक कार्य व त्यांचा मृत्यूचा प्रसंग आदींचे उत्कटतेने सादरीकरण केले. ज्योतिरावां च्या सर्वांचा निर्मिक या काव्याने त्यांनी नाटिकेचा शेवट केला. या विचार नाटिकेतून त्यांनी प्रबोधन केले की सावित्रीबाई व ज्योतिराव यांना अपेक्षित असलेला स्वस्थ समाज निर्माण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा .त्यांनी असे नमूद केले की समाजामध्ये समता, सत्य न्याय ,मानवता आणि बंधुता ही जीवनमूल्य रुजविणे आज गरजेचे आहे. मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून संघ अध्यक्षा सौ सुधा खराटे यांनी माय मराठी ही स्वरचित कविता सादर केली तसेच त्यांनी ज्योतिराव सावित्री तुम्ही होतात म्हणून ही ऋणनिर्देश करणारी कविता देखील सादर केली.
      कार्यक्रमाचा शेवट पसायदान व राष्ट्रगीताने  करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव श्री दिलीप तिडके यांनी केले तर आभार श्री ज्ञानदेव इंगळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कार्यकारणी सदस्य व सर्व संघ सदस्यांनी परिश्रम घेतले .सदर सभेस अनेक बंधू आणि भगिनी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.