फेकरी: _ भुसावळ तालुक्यातील फेकरी येथिल तक्षशिला बुद्ध विहारात येथे नुकतीच डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीची कार्यकारणी संदर्भात बैठक घेण्यात आली.
या बैठकीला माजी सरपंच राहुल वाघ हे अध्यक्ष स्थानी होते , बैठकीच्या सुरवातीला सर्व प्रथम भगवान बुद्धाची व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्प अर्पण करून त्रिशरण, पंचशील घेण्यात आले. त्यांनतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती २०२५ निवड बिनविरोध करण्यात आली.
ती पुढीलप्रमाणे अध्यक्ष पदी भुसावळ बाजार समितीचे उप सभापती प्रशांत निकम यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तर उपाअध्यक्ष पदी पत्रकार चंद्रशेखर निकम यांची निवड करण्यात आली,सचिव पदी कॉन्ट्रॅक्टर गुणवंत शेठ भटकर ,कोषाध्यक्ष पदी मोहित वाघ या सर्वांची एक मताने निवड करण्यात आली असून येणाऱ्या १४ एप्रिल २०२५ ही जयंती गावातील सर्व समाजातील लोकांना सोबत घेऊन एक वेगळ्या प्रकारे विविध समाज प्रभोधनाचे कार्यक्रम हाती घेऊन यावेळची मिरवणूक ही ऐतिहासिक करण्याचा मानस नवनिर्वाचित अध्यक्ष यांनी बोलून दाखवला, यावेळी वार्डातील संजय झालटे ,जीवन सुरवाडे,मनीष निकम,प्रफुल निकम,मेंबर संदीप निकम,प्रा. डॉ.निलेश गुरुचल सर,बबलू वाघ ,राजकीरण निकम,निलेश वाघ,पूर्वेश सुरवाडे,हर्षल निकम,आकाश वाघ,मिहीर बोदडे,यांची उपस्थिती होती तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सनी वाघ यांनी केले.