Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


छावा चित्रपट महाविद्यालयात दाखवण्याची दीपेश पाटील यांची मागणी

छावा चित्रपट शाळा महाविद्यालयात दाखवण्याची दीपेश पाटील यांची मागणी

सतीश पाटील भडगाव तालुका प्रतिनिधी
 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वर आधारित छावा चित्रपट प्रत्येक शाळा व महाविद्यालय मध्ये दाखवण्यात यावा. जणे करून महाराष्ट्रातील तरुण तरुणींनी युवा पिढीला छत्रपती शिवाजी महाराज ह्यांचे विचार तसेच त्यांचा इतिहासाची जाणीव होणे काळाची गरज आहे. आपण बघत असाल की अनेक वेळा आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्र एकी कडे म्हणून घेत असताना मात्र महिला अत्याचार देखील वाढत चाललेले आहेत. अस सर्व विषय लक्षात घेता छावा चित्रपट महाराष्ट्रातील प्रत्येक शाळा व महाविद्यालय मध्ये दाखवण्यात यावा.

शाळा व महाविद्यालयात चित्रपट दाखवण्या मागील कारणे.

१)छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहास प्रत्येक युवा पिढीला कळेल.
२)  शाळेत व महाविद्यालात दाखवण्यात आल्यास मुला मुलीच्या मधे एक प्रेरणा निर्माण होईल.
३)युवा पिढीत ह्या चित्रपट पहिल्या नंतर भविष्याची वाट कितीही खडतर असून देखील महाराज ज्या प्रमाणे लडले त्या प्रमाणे युवा पिढी मध्ये लढण्याची जिद्द निर्माण होईल.
४)महाराष्ट्रात तरुण पिढी ही त्यांचा स्वप्नांचा मागे धावत धावत  एवढ्या टेन्शन /डिप्रेशन मधे असते की ते कधी स्वतः खचून जाऊन टोकाची भूमिका घेतात. अशी मागणी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष डॉक्टर श्रीकांत फौंडेशन विभागीय समन्वयक दीपेश समाधान पाटील चोपडा यांनी प्रसिद्ध निवेदनाद्वारे केले आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.